Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्…

कंपनीची वाट लावण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत संबंधितांकडून २५ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2026 | 10:25 AM
पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्...

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : कंपनीला महाराष्ट्रात काम करायचे असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत कंपनीची कागदपत्रे काढल्याचा दावा करून व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा प्रकार एमआयडीसी भोसरी परिसरात समोर आला आहे.

कंपनीची वाट लावण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत संबंधितांकडून २५ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नेलविन पालमट्टम वर्गिस (वय ५१, रा. प्लॉट नं. ६२, सेक्टर नं. २६, प्राधिकरण, निगडी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८, व्यवसाय समाजकार्य, रा. चिंतामणी चाळ, गांधीनगर, पोखरण रोड नं. २, ठाणे पश्चिम), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ५३, व्यवसाय समाजकार्य, ठाणे पश्चिम) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

तसेच रमेश भिमा मांजरेकर (वय ३९, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, ठाणे पश्चिम) आणि सुनील राजेंद्र कानू (वय ३५, व्यवसाय कारवॉश, ठाणे पश्चिम) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आरोपी सुनील कानू ताब्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातही घडला होता असा प्रकार…

काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील सदाशिव पेठ भागात हॉटेलच्या केटरिंगचे कंत्राट टिकवून ठेवण्याच्या बदल्यात व्यावसायिकाला धमकावून 37 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश खाशाबा नलावडे (वय ५३), उमाकांत रामचंद्र वालगुडे (वय ५६), दिपक केशवराव धुमाळ (वय ६५, तिघेही रा. कोथरूड, पुणे), गणेश रत्नाकर भोज (वय ५३, रा. भिमपुरा कॅम्प), दिनेश अरुण खोडके (वय ४९), राजन शंकर कामठे (वय ५८ रा. फुरसुंगी) आणि नितीन हरिभाऊ वाघमारे (वय ५२ वर्षे, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

Web Title: Extortion of 5 crore demanded from businessman after threatening him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Extortion Case
  • Pimpri Crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
1

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
3

१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
4

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.