Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime : दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; परराज्यातील दोघांना पोलीस कोठडी

मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालीत असतांना दोन परप्रांतीय व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2025 | 11:40 AM
दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; परराज्यातील दोघांना पोलीस कोठडी

दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; परराज्यातील दोघांना पोलीस कोठडी

Follow Us
Close
Follow Us:
  • अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय कारवाई
  • जिल्हयातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन
  • दहा लाख रुपये लाख रपये बनावट चलनी नोटा सापडल्या
मालेगाव: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या स्लोगननुसार ग्रामीण पोलीस अॅक्शन मोडवर आहे. जिल्हयातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन, सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध तसे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरुन होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालीत असतांना दोन परप्रांतीय व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांची अंगझडती व बॅगा तपासले असता बॅगेत दहा लाख रुपये लाख रपये बनावट चलनी नोटा आढळून आल्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघा संशीयतांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

झेडपीच्या लाचखोर विस्तार अधिकाऱ्याला अटक; मूल्यांकन प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजारांची लाच

अशा आवळल्या संशयितांच्या मुसक्या

बुधवारी (29 ऑक्टोबर) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा बाळगून विक्री करण्याच्या हेतूने येणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चौधरी व कर्मचाऱ्याऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुंबई- आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर दोन इसम संशयास्थदरित्या आढळून आले. दोन्ही इसमांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना थांबवून पोलिसांनी विचारपूस केली, संशयित आरोपी नाजिर अकरम मोहम्मद अय्यूब अन्सारी (३४, रा. मोमिनपुरा, बुरहानपुर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (३३. रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. ३१, बुरहानपुर, मध्य प्रदेश) यांची तपासणी केली.

नोटा कुठून आणल्या, तपास सुरू

तपासणीत त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रूपये दराच्या २००० बनावट नोटा, तसेच दोन मोबाईल, चॉकलेटी-काळी सॅक (बंग) असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३(७) अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

दोघे संशयित हे परप्रांतीय असून, सदरच्या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या व कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याबाबत तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे करीत आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग यशवंत बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिति सार्वजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलीस हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, गणेश जाधव, मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Mumbai hostage scare: सरकारी निविदा रक्कम न मिळाल्याने रोहित आर्य नाराज? मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी होता तरी कोण?

Web Title: Fake notes worth ten lakh seized malegaon police carry out major operation two people from another state arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

आई आहे की हैवान! गर्भवती मुलीचे पोट कापलं, सावत्र वडिलांनी बाळ बाहेर काढलं अन्…; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
1

आई आहे की हैवान! गर्भवती मुलीचे पोट कापलं, सावत्र वडिलांनी बाळ बाहेर काढलं अन्…; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?
2

लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना
3

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत
4

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.