संग्रहित फोटो
मारोती बाळासाहेब बनसोडे (वय ३५, चिंचवड, मूळ- परळी, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित दशरथ साळुंखे (वय २६, थेरगाव, मूळ – बारामती, पुणे), किशोर सुभाष वाघमारे (वय ३९, थेरगाव, मूळ- बीड) आणि भारत संजय पवार (वय २३, थेरगाव, मूळ बारामती, पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारोती बनसोडे याने आरोपी अमित याच्या बहिणीची छेड काढली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्या कारणावरून मारोती बनसोडे यांना आरोपींनी तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर आणि गुप्तभागावर जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
वहिनी बघून हसल्याचा राग अनावर
घरासमोरील सांडपाण्यावरून सुरू असलेला वाद, त्यात मनात साचलेला राग आणि आपल्याकडे पाहून हसली या गैरसमजातून दिराने वहिनीच्या डोक्यात लोखंडी सळई घातल्याचा धक्कादायक प्रकार हर्षनगर, लेबर कॉलनी परिसरातून समोर आला आहे. लता गंगाधर साळवे (वय ५१) यांचा मृत्यू सुरुवातीला डोक्याला मार लागून झाल्याने अकस्मात मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला होता. मात्र, मुलाने व्यक्त केलेला संशय आणि पोलिसांच्या तपासातून हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लता यांचा दीर सुभाष कचरू साळवे याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.






