खळबळजनक ! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत चुंबन घेतलं अन्...
मंगळवेढा : अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील आहे. पीडित मुलगी रात्री साडेआठच्या सुमारास मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये आली. तेव्हा तिने घडला प्रकार सांगितला. यानंतर मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेऊन फिर्याद दाखल केली.
मंगळवेढा पोलिसांनी शून्य क्रमांकाने कामती पोलिस स्टेशनला वर्ग करून पीडित मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहच केल्याने त्या पीडितेला न्याय मिळाला. पीडित मुलगी ही मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात राहावयास आहे. तिच्या आईचे वडिलाबरोबर पटत नसल्यामुळे ती वडिलापासून गेली 10 वर्षांपासून मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात विभक्त राहत आहे. 19 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास यातील पीडित मुलीचा बाप घरी होता. तर तिचे आजोबा एका कारखान्यात कामावर गेले होते. ही संधी साधून नराधम बापाने मुलीस ‘तुला नवीन ड्रेस आणला आहे, तो मला घालून दाखव’ असे नाटक केले.
हेदेखील वाचा : Karad Crime: चोरट्यांनी घरात जाऊन कोयत्याचा धाक दाखवला अन्…; ‘त्या’ कुटुंबासोबत नेमके घडले काय?
दरम्यान, पीडित मुलीने नवीन कपडे घातले नाहीत. तेव्हा नराधम आरोपीने घराच्या दाराला कडी लावून अंथरून टाकून हात-पाय दाबण्याचा बहाणा केला. त्यावेळी पीडितेने वडीलाचा शब्द प्रमाणित मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढून चुंबन घेतले व अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.
पीडितेने करून घेतली स्वत:ची सुटका
यावेळी पीडितेने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या हाताला चावा घेतला. मात्र, पीडित मुलीपेक्षा आरोपीची ताकद जास्त असल्याने त्याने तिला सोडले नाही. त्यानंतर या घटनेबाबत तू कोणाला काही सांगू नकोस, असा दमही दिला. यावेळी पीडितेने आरोपीस जोरात ढकलून सुटका करून घेतली व दाराची कडी काढून बाहेर पळत येऊन बाहेरून दरवाजाला कडी लावली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.