कराडमध्ये अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी (फोटो- सोशल मिडिया)
हेळगावला कराड – कोरेगाव रस्त्यालगतच्या सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घराचा किचनचा दरवाजा जोरजोरात आपटत चोरट्यांनी कडी काढून आत प्रवेश केला. त्यावेळी सुनंदा या जाग्या झाल्या. टी-शर्ट व बरमोडा घातलेला ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरट्यांनी सुनंदा सूर्यवंशी यांना कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने त्यांच्या व मुलीच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावून घेतले.
किचनच्या शेजारील बेडरूम मधील लोखंडी कपाट ड्रॉवर उचकटाऊन सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे डूल असा एकूण सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण अडीच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत उसाच्या शेतातून पोबारा केला. चोरट्यांनी बाजूच्या नंदा हनमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे,बाबासो जगन्नाथ पाटील, अर्जुन भिमराव सुर्यवंशी यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरीची फिर्याद सुनंदा सूर्यवंशी यांनी मसूर पोलिसात दिली आहे. तपास सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत.krai
माणुसकी हरवली ! पुण्यात अपघातानंतर मदत करण्याऐवजी दाम्पत्याला लुटलं