समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण
खापरखेडा : वडिलाने स्वतःच्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा येथे नुकतीच घडली. आशा सेविकेमुळे हा प्रकार उघड झाला आणि पोलिसांत पोहोचला असून, आरोपीस अटक केली. आरोग्य विभागामार्फत ‘दवाखाना आपल्या दारी’ अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.
हेदेखील वाचा : ‘तेव्हा मी थरथर कापते…,’ कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप
आशा सेविका रमा चौधरी या विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी बाभूळखेडा (ता. कामठी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या होत्या. तपासणी करत असताना इयत्ता तिसरीत शिकणारी नऊ वर्षीय विद्यार्थिनी पोटात दुखत असल्याचे सांगून रडायला लागली. त्यामुळे रमा यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा तिने घडलेला संपूर्ण प्रकार व वडिलांचे कृत्य रमा यांना सांगितले. त्यांनी या प्रकाराची माहिती जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, पीडित विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीनंतर होम चाईल्ड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. रमा चौधरी यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी शनिवारी (दि. 7) रात्री गुन्हा नोंदवून आरोपी वडिलास अटक केली.
अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होणे बाकी
आरोपी वडील हा मजुरी करून उदरनिर्वाह करतो. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला की नाही, याची माहिती कुणालाही नाही. मात्र, तिने हा प्रकार रमा चौधरी यांना सांगितला आणि जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पोलिसांत तक्रार दाखल केली. तिचा जबाब व इतर बाबींवरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची चिन्हे दिसून येत नाहीत, अशी माहिती होम चाइल्ड सेंटरमधील सूत्रांनी दिली. त्यामुळे या घटनेत विरोधाभास निर्माण झाला आहे.
हे सुद्धा वाचा: दुचाकी पार्किंगवरून झाला वाद; महिलेचा विनयभंग करून शिविगाळही केली