डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
अहमदनगर : पार्किंगच्या वादातून मोची गल्लीत महिलेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना घडली. याप्रकरणी नगर शहरातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विनयभंग, मारहाण, अॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Crime News: महाराष्ट्र पुन्हा हादरला; अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार मग दगडाने ठेचून हत्या
शकुर अजिज शेख, अजिज शकुर शेख, अकलाक मन्सुर शेख (सर्व रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे. फिर्यादी यांनी मोची गल्ली येथील महावीर दुकानसमोर त्यांची दुचाकी पार्क करून शेजारच्या कापड दुकानात गेल्या. फिर्यादी व त्यांच्या आई दुकानात असताना तेथे एक अनोळखी व्यक्ती आला व त्याने पार्किंग केलेली दुचाकी काढून घेण्याचे शकुर शेख याने सांगितले असल्याचे सांगितले.
फिर्यादीचे व्हिडिओ शूटिंगही काढले
फिर्यादी दुचाकी काढण्यास गेल्या असता शकुरने फिर्यादीची दुचाकी रस्त्यावर आडवी लावलेली दिसली. फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ केली. त्याचा मुलगा अजिज याने फिर्यादीची व्हिडिओ शूटिंग काढून व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्या दोघांनी फिर्यादीला मारहाण केली.
महिलेला जमिनीवर ढकलूनही दिले
दरम्यान, अजिज याने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत जमिनीवर ढकलून दिले. अकलाक शेख याने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : UP मधील रुग्णालयाचा प्रसुती करण्यासाठी नकार; महिलेने ॲम्ब्युलन्समध्येच दिला बाळाला जन्म