Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: संतापजनक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

महिला पत्रकाराने थेट पोलिसांकडे धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन ढोलताशा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 10:05 AM
Pune News: संतापजनक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:
  • ढोल-ताशा पथकातील सदस्यांकडून महिला पत्रकाराचा विनयभंग
  • महिला पत्रकाराला नकोसा स्पर्श करत शिवीगाळ
  • लक्ष्मी रस्त्यावर फोटोग्राफर्सना मंडळातील लोकांकडून धक्काबुक्की

Pune News: पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन पार पडले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक घटना घडली. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन ढोल-ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पुण्यातही दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. त्याच ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या २० वर्षीय महिला पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्याला पथकातील सदस्यांकडून अडथळा आणण्यात आला आणि त्यानंतर विनयभंगाची घटना घडली.

Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर

दरम्यान, त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. याच वेळी पथकातील एका सदस्याने ढोल-ताशा ट्रॉलीचे चाक पत्रकाराच्या पायावरून फिरवले. याचा जाब विचारण्यासाठी त्या गेल्या असता, त्याच सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिल्याचा आरोप आहे. महिला पत्रकाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या सहकाऱ्याने या प्रकाराबाबत जाब विचारला असता, पथकातील सदस्याने त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केली.

यानंतर महिला पत्रकाराने थेट पोलिसांकडे धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन ढोलताशा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला असून, महिला पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

SA vs ENG : तिसऱ्या सामन्यात इंग्लडने दक्षिण आफ्रिकेचा उडवला धूव्वा! इंग्लिश संघाने 342 धावांनी मिळवला विजय

पुण्यात छायाचित्रकारांना धक्काबुक्की

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करताना छायाचित्रकारांना ताल ढोल-ताशा पथकातील वादकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. फोटो काढण्यास मनाई करून त्यांना रस्त्यावरून बाजूला होण्यास भाग पाडण्यात आले.दरम्यान, बेलबाग चौकात टिळक पुतळ्याकडून येणारे जिलब्या मारुती मंडळ मिरवणुकीसाठी मार्गस्थ होत असताना शिवाजी रस्त्याचे मुठेश्वर मंडळ पुढे आले. या वेळी दोन्ही मंडळांच्या ढोल-ताशा पथकातील सदस्यांत पुढे जाण्यावरून हाणामारी झाली. मात्र, मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटवला.

 

Web Title: Female journalist molested during immersion procession in pune case registered against members of the drum and drum team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
1

Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर

Anant Chaturdashi 2025 : पुण्यातील टिळक रस्त्यावर डीजे गाण्यांवर थिरकली तरुणाई; ढोल-ताशांचीही मिळाली साथ
2

Anant Chaturdashi 2025 : पुण्यातील टिळक रस्त्यावर डीजे गाण्यांवर थिरकली तरुणाई; ढोल-ताशांचीही मिळाली साथ

पिस्तुले बाळगणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
3

पिस्तुले बाळगणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या 5 ही गणपतींचे विसर्जन; लक्ष्मी रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी
4

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या 5 ही गणपतींचे विसर्जन; लक्ष्मी रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.