आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले (संग्रहित फोटो)
नागपूर : सोबत काम करणाऱ्या एका तरुणाने आधी मैत्री करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे सतत शोषण केले. तरुणीने त्याला विरोध करत दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या आरोपीने तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून ते व्हायरल केले. ही संतापजनक घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
२५ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपी युवराजसिंग बघेल (वय २२ वर्ष, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी युवराजसिंग हे एकाच कंपनीत एकत्र काम करत होते. कामादरम्यान त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेमसंबंधात झाले. यानंतर आरोपी युवराजसिंग तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला.
पोलिस तपासाला वेग
आपली फसवणूक आणि बदनामी झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने थेट बेलतरोडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवराजसिंग बघेलविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित विविध कलमांन्वये आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या फरार आरोपी युवराजसिंगचा कसून शोध घेत आहेत.
गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या






