आरोपीचा मित्र असल्यानेच झाली अटक; ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात नाव आलं अन्...
नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. आता नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर घरतील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मोहन ठाकरे असे आहे. विशेष म्हणजे यांची हत्या करणारा दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याची पत्नी आहे. ही घटना सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळच्या मलगोंडा येथे उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीचा नाव प्रभा यशवंत ठाकरे आहे. आला अटक केली आहे. आरोपी पत्नीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने नाशिक जिल्हा हादरला आहे.
आधी दिली धमकी; पेट्रोल घेऊन शेतकरी शिरला आमदाराच्या घरात, काळजाचा ठोकाच चुकला; काय घडलं पहा?
नेमकं काय प्रकरण?
यशवंत ठाकरे १४ एप्रिल २०२५ पासून घरातून बेपत्ता होते. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने त्यांच्या आई- वडिलांनी पत्नी प्रभा ठाकरे हिच्याकडे विचारणा केली. तर प्रभाणे यशवंत हे गुजरातच्या बिलिमोरा येथे मजुरीसाठी गेले असल्याचे पत्नीने आई- वडिलांना सांगितले. मात्र पाऊस पडून मुलगा घरी आला नाही म्हणून आई- वडिलांची चिंता वाढली.
यानंतर त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रभा यशवंताला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना प्रभावर संशय आला. तायतच घराची ओसरी खड्डा करून शेण आणि मातीने सारवलेला कुटुंबियांना दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुन प्रभाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी महसूल विभागासमवेत पंचनामा करीत घरातील ओसरीवरील खड्डा खोदला. परंतु तिथे मृतदेह आढळून आला नाही. प्रभाने तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले. आणि काही झालेच नाही अशी ती वावरत होती.
त्यानंतर दोन दिवसांनी यशवंताचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाणे मांडीखाली लपवली. यामुळे उत्तमच्या पत्नीला प्रभावर संशय आला. तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने या गोष्टीच्या आधारे तपास घेतला. तेव्हा तो यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्याजवळ कुजलेला वास येत होता. तसेच शोषखड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्यातील माती उकरुन पहिली. तेव्हा त्याचं पायाखालची जमीनच सरकली. त्या ठिकाणी मृतदेह आढळून आला. त्याने तातडीने याबाबत पोलिसांनी कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून कुजलेल्या अवस्थेतील यशवंतचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मयताची पत्नी पप्रभाला ताब्यात घेत विचारपूस केली. तेव्हा प्रभाणे हत्या केल्याची कबुली दिली. आपणच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली दिली.