Photo Credit- Social Media सैफ अली खान हल्ला प्रकरणात फॉरेन्सिक अहवालामुळे पोलिसांना वेगळाच संशय
मुंबई: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सैफअली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम शहजादला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या बोटांचे ठसे सीआयडीकडे पाठवले होते. पण हल्लेखोरांच्या बोटांचे ठसे आणि शरीफूलच्या बोटांच्या ठशासी जुळत नसल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट सीआयडीने मुंबई पोलिसांना पाठवला आहे. त्यामुळे सैफ अली खानवर एकापेक्षा जास्त लोकांनी हल्ला केलाय का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सैफ अली खानच्या घरात हल्लेखोराच्या 19 बोटांचे ठसे आढळले होते. मुंबई पोलिसांनी त्याचे नमुने आणि आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद यांच्या बोटांचे ठसे सीआयडीला पाठवले होते. सीआयडीच्या लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर सैफच्या घरात आढळलेले ठसे आणि अटकेत असलेल्या शरीफुलचे ठसे जुळले नसल्याच्या अहवालात आढळून आले आहे.
सैफच्या घरात आढळलेले बोटांचे ठसे दुसऱ्या व्यक्तीचे आहेत, ज्यामुळे सैफवर हल्ला करणाऱ्यांचा शोध अधिक गुतागुंतीचा झाला आहे. पोलिसांनी शरीफुलच्या दहा बोटांचे ठसे तपासणीसाठी सीआयडीकडे पाठवले होते, पण त्या ठशांशी घरात आढळलेल्या ठशांचे जुळणारे ठसे नाहीत. या रिपोर्टच्या आधारावर तपास पुण्यातील सीआयडी पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आला आहे. सीआयडीच्या रिपोर्टमुळे तपासाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे या हल्ल्यात एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असू शकतो, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.