Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat प्रकरणात वैभव नाईक यांची मोठी मागणी; म्हणाले…

सरकारी पक्षातील लोकांना वाचविण्यासाठी या प्रकरणाचा तपास उशिरा केला की काय, याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 02:47 PM
Ashok Kharat प्रकरणात वैभव नाईक यांची मोठी मागणी; म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

भोंदूबाबा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी 
राज्याच्या गृह विभागावर केला आरोप
निवडणूकीच्या भीतीने उशीरा तपासला सुरूवात

कणकवली: भोंदू अशोक खरात याच्याबाबत पीडित महिलेने वर्षभरापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्याचा तपास पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. परंतु या सरकारमध्ये जे काही दोन तीन पक्ष सहभागी आहेत, त्या पक्षातील अनेक लोक या भोंदू बावामळे अडचणीत येणार होते. म्हणून गृह विभागाने नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास लोकांपुढे आणण्याचे काम केले आहे, असा आरोप उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षातील लोकांना वाचविण्यासाठी या प्रकरणाचा तपास उशिरा केला की काय, याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण या प्रकरणात अनेक राजकीय लोक सहभागी असल्याचे पुढे येत आहे.

निवडणुकांपूर्वी हे प्रकरण उघड झाल् असते तर, या प्रकरणामुळे जनतेमध्ये सरकारबद्दल रोष निर्माण होणार होता.  त्यामुळेच भोंदूबाबा खरात याचे प्रकरण निवडणुकीनंतर पद्धतशीरपणे बाहेर काढत की काय, अशी शंका जनतेमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले

अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. खरातच्या राजकीय संबंधांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातही खरातवर लाभांची खैरात केल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवून खरातच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी

अशोक खरातच्या या वाढत्या प्रभावाचा फायदा त्याला थेट शासकीय निर्णयांमध्येही झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी खासगी संस्थानाला वळवण्यात आल्याचा आरोप यामुळे अधिकच बळकट झाला आहे.

 

Web Title: Former mla vaibhav naik demand to enquiry ashok kharat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case: अंधश्रद्धेचा आरोप की सत्तेचा गैरवापर? महिला आयोग वादाच्या भोवऱ्यात
1

Ashok Kharat Case: अंधश्रद्धेचा आरोप की सत्तेचा गैरवापर? महिला आयोग वादाच्या भोवऱ्यात

Ahilyanagar News: खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत
2

Ahilyanagar News: खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख
3

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

Ashok Kharat Case : अरे हा माणूस आहे की शैतान! नवऱ्याला खोलीबाहेर ठेवून भोंदू बाबा खरातचा गरोदरबाईवर अत्याचार, गुन्हा दाखल
4

Ashok Kharat Case : अरे हा माणूस आहे की शैतान! नवऱ्याला खोलीबाहेर ठेवून भोंदू बाबा खरातचा गरोदरबाईवर अत्याचार, गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.