Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

सर्व मित्र लहानपणापासून एकत्र होते. महाबळेश्वरला फिरण्यासाठी मित्रांचा हा प्रवास सुरू झाला होता. मात्र, शिरवळजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर दुःखद घटनेत झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 11, 2026 | 10:07 AM
महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

शिरवळ : कामशेत येथून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांच्या कारला शिरवळजवळ भीषण अपघात झाला. सातारा-पुणे महामार्गावर हॉटेल शिवालयसमोर मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सातारा दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरला जोरदार धडकली. त्यानंतर कारने तब्बल चार ते पाच पलट्या घेतल्या आणि सातारा-पुणे दिशेने जाणाऱ्या महामार्गाच्या शेवटच्या लेनमध्ये जाऊन पडली. त्याचवेळी कारची समोरून येणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात वेदान्त अर्जुन वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धिरेद्र ठाकूर (वय १९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे, ता. मावळ) आणि निखील बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला. तर दिक्षीत दयानंद पुजारी (वय २०, रा. कामशेत) आणि मयुर हनुमंत शिंदे (वय २०, रा. बऊर, कामशेत) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मित्र लहानपणापासून एकत्र होते. महाबळेश्वरला फिरण्यासाठी मित्रांचा हा प्रवास सुरू झाला होता. मात्र, शिरवळजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर दुःखद घटनेत झाले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

जळगावातही भीषण अपघात

दुसऱ्या एका घटनेत, जळगाव शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराबाहेरून जड वाहतूक जावी आणि शहरातील रस्ते मोकळे राहावेत, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल बंद पडल्याने मोठी वाहने पुन्हा शहरातून धावू लागली. याच बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा फटका एका कष्टकरी महिलेला बसला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Web Title: Four killed in a horrific accident near shirwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Accident News
  • pune news
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.