Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदिपजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 12:58 PM
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

ओतर/मनोहर हिंगणे : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदिपजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात दुचाकीवरील चारही तरुण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे डिंगोरे आणि मराडवाडी, आंबेदरा परिसरावर शोककळा पसरली असून, परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.

 

१) आशिष ढवळु भले (वय २४, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर), २) दिपक सखाराम भले (वय २८, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ३) शिवराम नारायण पारधी (वय २६, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ४) खंडु नारायण भले (वय २५, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ​अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विठ्ठलवाडी-पाथर्डी एसटी. बस (क्र. MH 20 BL 2983) ही माळशेज घाट मार्गे ओतूरच्या दिशेने येत होती. याच वेळी ओतूरच्या दिशेकडून डिंगोरेकडे एकाच दुचाकीवरून (स्प्लेंडर क्र. MH 14 MA 7849) चार तरुण चालले होते. महामार्गावरील हॉटेल जीवनदीपच्या थोडे पुढे येताच एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि चारही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले.

​अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या तरुणांपैकी तिघांना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे व डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर चौथ्या तरुणाला तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु तेथील डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू

​भीषण अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत. ​एकाच गावातील चार तरुण मुलांचा अपघातात अशा रीतीने दुर्दैवी अंत झाल्याने डिंगोरे परिसरातील आदिवासी बांधवांवर आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

Web Title: Four people have died in a major accident on the ahilyanagar kalyan highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Bus Accident

संबंधित बातम्या

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
1

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू
2

घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
3

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
4

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.