Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पुणे-इंदूर महामार्गावर शनिवारी (दि. ४) सायंकाळी मद्यधुंद ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे. ट्रकने महामार्गावरील घंटागाडी, दुचाकी, रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2026 | 12:47 PM
पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

Follow Us
Follow Us:

मनमाड : पुणे-इंदूर महामार्गावर शनिवारी (दि. ४) सायंकाळी मद्यधुंद ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे. ट्रकने महामार्गावरील घंटागाडी, दुचाकी, रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ६ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला संतप्त नागरिकांनी थरारक पाठलाग करून पकडले आणि चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानहून सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) शहरातील मुख्य चौफुलीवर आला असता, मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने प्रथम महापालिकेच्या घंटागाडीला आणि त्यानंतर एका दुचाकीला जबर धडक दिली. एवढ्यावरच न थांबता या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या अचानक झालेल्या घटनेमुळे महामार्गावर एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली होती. अपघातानंतर चालक ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, उपस्थित नागरिकांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग केला आणि ‘नगिना मशीद’ परिसरात ट्रकला अडवून चालकाला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

अपघातातील जखमी

या अपघातात एकूण ६ जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये रोहित अहिरे (वय १९, रा. नजराणा सोसायटी), सचिन घोडके (वय ३८, रा. आंबेडकर नगर), भिका बढे (वय ६०, रा. पांझनदेव), गोरख नाईकवाडे (वय ७६, रा. बोयेगाव), यशवंत भालनोर (वय ५०, रा. कुंदलगाव), भगवान भालनोर (४५, रा. कुंदलगाव) यांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे पुणे-इंदूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी मद्यधुंद ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

Web Title: An incident has occurred on the pune indore highway where a drunk truck driver ran over pedestrians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Accident News
  • Arrested
  • crime news

संबंधित बातम्या

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
2

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक
3

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान
4

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.