Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून बसने १४ वाहनांना धडक दिल्याने साखळी अपघात घडला. या दुर्घटनेत १२ ते १३ रिक्षांसह अनेक वाहने बाधित झाली असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 05:29 PM
मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट

मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत पुन्हा भीषण अपघात!
  • बेस्ट बसचे ब्रेक फेल?
  • अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक
  • प्रवाशांमध्ये घबराट
Mumbai BEST Bus Accident News Marathi : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात शुक्रवारी (10 जुलै 2026) मोठा रस्ते अपघात घडला. बेस्ट बसने नियंत्रण गमावल्याने तब्बल १४ वाहनांना धडक दिली. या साखळी अपघातात १२ ते १३ रिक्षांसह इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवासी आणि वाहनचालक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला.

प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेतील गजबजलेल्या मार्गावर बेस्ट बस अचानक भरधाव वेगाने पुढे गेली आणि समोर उभ्या असलेल्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक देत गेली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की अनेक रिक्षा एकमेकांवर आदळल्या, तर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी

ब्रेक निकामी झाल्याची प्राथमिक शक्यता

प्राथमिक माहितीनुसार, बेस्ट बसचे ब्रेक निकामी (ब्रेक फेल) झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास वाहतूक पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून सुरू आहे. तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

वाहतूक काही काळ ठप्प

या अपघातामुळे अंधेरी पश्चिमेतील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी मोठ्या प्रमाणावर जखमी आणि वाहनांचे नुकसान झाल्याने बेस्ट बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बसची नियमित तांत्रिक तपासणी, ब्रेक प्रणालीची देखभाल आणि सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षाव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी या घटनेनंतर पुन्हा जोर धरू लागली आहे.

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार

Web Title: Mumbai andheri best bus accident 14 vehicles chain collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Best
  • Bus Accident
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
1

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल
2

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
3

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
4

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.