crime (फोटो सौजन्य: social media)
रत्नागिरीत जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेची तब्बल २ लाख २९ हजार 132 रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. वर्क फ्रॉम होमच आमिष दाखवून टेलिग्रॅमवर ही फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येणेगुर येथील एका विद्यालयातील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या नाव नीता प्रेमदास गमरे आहे. नीता यांना टेलीग्राम अॅप्लिकेशनवर ‘वंशिका’ नावाच्या अकाउंटवरून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी या ऑफेरला होकार दिल्यानंतर कस्टमर सपोर्ट नावाच्या टेलिग्राम ग्रुपमधील हिना, निखिल पाटील (ओनर), विघ्नेश (अॅडमिन) आणि टाटा क्लिक कंपनीचे सीनियर प्रमोटर असल्याचे सांगण्यात आले. सुमित यांनी वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भारण्यासही त्यांना सांगितले गेले. यावेळी पीडित नीता यांनी त्यांच्या २ लाख २९ हजार 132 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. परंतु पैसे भरूनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. त्यांनतर ओपींनी त्यांना दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे भरण्याचा आग्रह केला. यांनतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नीता यांनी पोलीस स्टेशन गाठले. ही घटना २३ ते २९ जून २०२५ या कालावधीत घडले असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हातगाडीला धडक लागल्याने कारचालकास बेदम मारहाणकरून केले ठार
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर येथे शुक्रवारी एका हातगाडीला एका कारणे धडक दिल्याने कारचालकास बेदम मारहाण करून त्याला ठार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात जातीय तणावाची स्थिती निर्माण झाली असून परिसरात घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उशिरा घडली.
खळबळजनक ! दिव्यांगाचा गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता शेतातील गोठ्यात थांबली अन्…