धाराशिव: जिल्ह्यातील येणेगूर येथील एका शाळेतील २९ विध्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ, उलटीचा त्रास. या विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा समोर आला आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यात सर्वाधिक मुली आहेत. हा प्रकार नेमकं दूषित पाण्यातून झाला की अन्नातून, याचा आरोग्य विभागाकडून तपास सुरु आहे. ते वैद्यकीय अहवाल आल्यानंतर समोर येईल. सर्व विध्यार्थीयांची प्रकृती स्थित असून शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात ही घटना घडली. या विद्यालयाची पटसंख्या जवळपास चारशे आहे.
शुक्रवारी जवळपास दोनशे विद्याथी विद्यालयात होते. त्यापैकी १४ मुलीना दुपारी उलटी, मळमळ होऊ लागली. यातील दहा मुलींना येणेगुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर चार मुलींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने शाळेत येऊन अनेक विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यातून १५ विद्यार्थ्यांना त्रास असल्याचे निष्पन्न झाले. सद्यःस्थिती येणेगूरच्या आरोपाग्या केंद्रात २५ जणांवर, तर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात चार मुलींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी उमाकांत बिराजदार, येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा साळुंखे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली.
पाण्याची रिपीट टेस्ट निगेटिव्ह
तपासणीत पोटात दुखणे, चक्कर येणे असा आजार दिसून आला. २५ विद्यार्थ्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. शाळेतील पाण्याची रिपीट टेस्ट निगेटिव्ह आहे. बॉयोलॉजिकल टेस्टसाठी नमुने धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत असे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा साळुंखे यांनी सांगितले.
पैश्यांसाठी पाच वर्षाच्या मुलाला आईने विकले; रत्नागिरीत जिल्ह्यातील प्रकार
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैश्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलाला आईने विकल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता गुहागर एस.टी. स्टैंड परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे..
पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. आरोपी अरबिना सुफियान पांजरी (वय २४) रा. हर्णे बाजारमोहल्ला हिने आपल्या ५ वर्षाचा मुलगा अरहान सुफियान पांजरी यास पैशासाठी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२) रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी याला विकले. मात्र या प्रकरणाची गंभीर दाखल घेत दापोली पोलिसांनी दोघांविरुद्ध ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५’ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बस्थानकात गोळीबार; तरुणाचा मृत्यू