Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा

नागपूरजवळील कन्हान नदीत प्रेयसीला पुलावरून ढकलून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आशीष मनपिया याला अटक केली आहे. लग्न आणि मैत्रीच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करून हत्येचा उलगडा केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 05, 2026 | 02:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्न आणि मैत्रीच्या वादातून आरोपीने प्रेयसीला जुन्या रेल्वे पुलावरून नदीत ढकलल्याचा आरोप.
  • कन्हान नदीत बुडून 29 वर्षीय अश्विनी डे हिचा मृत्यू झाला.
  • सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी आशीष मनपिया याला अटक.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशीच तिची हत्या तिच्याच प्रियकराने केली. लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून प्रेयसीची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

अश्विनी सुरेश डे (२९ वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर आशीष मनपिया असे आरोपीचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी आशिष हा अश्विनीच्या घरी गेला होता. त्यानंतर उशिरा रात्री सुमारे दीडच्या सुमारास दोघांमध्ये लग्न आणि त्यांच्यातील मैत्रीवरून जोरदार वाद सुरु झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात आशीषने अश्विनीला जुन्या रेल्वे पुलावरून खाली नदीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाला.

अडीच वर्षांत न्यायालयात केवळ पाच हजेरी; मुंबई हायकोर्टाचा संताप, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला जामीन

आरोपीला कसे पकडले?

पोलिसांना दुसऱ्या दिवशी कन्हान नदीत अश्विनीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपास, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर नागपूर शहरातील ऑटोमोबाईल चौक परिसरातून आरोपी आशीष मनपिया याला पोलिसांनी अटक केली. आशिषविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांचे सुमारे 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच मृत अश्विनीवरही २ गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.

चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् पतीचे अनैतिक संबंध; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारडी परिसरातून कौटुंबिक छळाची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ याला कंटाळून 31 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पतीचे कथित अनैतिक संबंध आणि त्यावरून घरात सतत वाद होत असल्याची बाबही समोर आली आहे.

Akola Crime News: ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय आहे?

    Ans: अश्विनी सुरेश डे.

  • Que: आरोपीला पोलिसांनी कशाच्या आधारे अटक केली?

    Ans: सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: लग्न आणि मैत्रीवरून झालेला वाद.

Web Title: Friendship day ends in a bloody tragedy girlfriend pushed off a bridge into the river following a dispute over marriagenagpur murder case solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…
1

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली
3

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.