
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
नागेपल्ली येथील आरडी एजंट रवींद्र तंगडपल्लीवार यांची १९ जानेवारीला सिरोंचा मार्गावर खून झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यांनतर
सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांना मृतदेह सोपविला. त्यांनतर रवींद्र तंगडपल्लीवार यांच्यावर मंगळवारी (२० जानेवारी) रोजी अंत्यविधी पार पडली. या अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी हजेरी लावली होती. यावेळी यादव कोलपाकवार, पत्नी अर्चना कोलपाकवार आणि मुलगा अभिजित कोलपाकवार, सुनील कोलपाकवार, पद्मा कोलपाकवार हे पाचही जण अंत्यविधी साठी हजर होते.
अपघात कसा झाला?
ते अंत्यविधी आटोपून आपल्या चारचाकी वाहनाने आष्ठीकडे निघाले होते. अरुंद पुलावरून येताना वाहनाचा तोल गेल्याने हुंडई व्हेन्यू ही कार थेट दिना नदीत कोसळली. समोर आलेल्या माहितीनुसार, या वेळी कारमध्ये पाच जण होते. आलापल्लीहून आष्टीकडे कारने परतताना दिना नदीवरील पुलावरून जात होते. अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने तोल गेला आणि कार ही नदीत कोसळली . अपघात इतका भीषण होता की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू तर…
चारचाकी वाहन दीना नदीच्या पुलावरून वाहन कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरु केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर तिघे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. नदीत कोसळलेल्या कारमधून जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेने हळहळ व्यक्त
उपचार दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव यादव विठ्ठलराव कोलपाकवार (73) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (55) असे आहे. तर अभिजीत यादव कोलपाकवार (40), अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे तीन जण गंभीर जखमी आहेत. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे.
Gadchiroli Crime: बेपत्ता आरडी एजंटचा जंगलात निर्घृण अवस्थेत मृतदेह; हाताचे बोट छाटलेले….
Ans: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात खमनचेरू–बोरी दरम्यान दीना नदी पुलावर.
Ans: यादव विठ्ठलराव कोलपाकवार (73) व सुनील मुरलीधर कोलपाकवार (55).
Ans: एकूण पाच जण होते, त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत.