Crime News : आम्ही इथले भाई आहोत, तुला इथून…; टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण
काय नेमकं प्रकरण?
दीपक यू हा पुथियारा या ठिकाणी त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होता. १६ जानेवारी रोजी कामासाठी तो कन्नूरला गेला होता. तिथून तो पय्यानूर रेल्वे स्थानकातून अरिकोडला जाणाऱ्या खासगी बसने प्रवास करत होता. त्यावेळी त्याच बसमध्ये शिमजिथा मुस्तफा देखील प्रवास करत होती. ही बस त्यावेळी तुडुंब भरलेली होती. त्यावेळी दिपकचा धक्का शिमजिथा मुस्तफा हिला लागला, असे तिने आरोप केले आहे.
व्हिडीओमध्ये केलेले आरोप काय?
शिमजिथाने बसमध्ये एक १८ सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं आरोप केला होता की, दीपकने जाणीवपूर्वक तिला अश्लील स्पर्श केला आहे. असे तिने व्हिडिओमध्ये आरोप केले आहे.
दीपक मानसिक तणावाखाली गेला
शिमजिथाने जो व्हिडीओ बनवला तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर दीपक मानसिक तणावाखाली गेली होती. दोन दिवस त्याने काही खाल्लं देखील नाही. रविवारी सकाळच्या सुमारास ७ वाजता आई- वडील त्याला उठवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेले पण त्याने दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याच्या रूमचा दरवाजा तोडला असता दिपकने रूममध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहे. व्हायरल व्हिडिओच्या दृष्टीकोनातूनही तपास केला जात आहे.
कुटुंबीयांनी फेटाळले आरोप
या घटनेनंतर दिपकच्या कुटुंबीयांनी शिमजिथाने केले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्याच्या वडिलांनी म्हंटल की, आमचा मुलगा निर्दोष होता. तो असं करूच शकत नाही. व्हिडीओ व्हायरल होताच अपमान झाल्याच्या भावनेनं तो अस्वस्थ झाला होता होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपक कोणाशीच बोलला नव्हता. त्यानं स्वत:ला खोलीत बंद करून घेतल्याचंही कुटुंबियांनी सांगितलं.त्याचं कशातही लक्ष नव्हतं, तो खातही नव्हता, याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू आणि न्याय मागू.
शिमजिथाने शेअर केला आणखी एक व्हिडीओ
या घटनेनंतर शिमजिथाने आणखी एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. आपण आपल्या आरोपांवर ठाम असून दीपकने जाणीवपूर्वक स्पर्श केल्याचं म्हटलंय. मात्र दीपकचा आधीचा व्हिडीओ तिने डिलिट केला आहे.
Crime News: ५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले
Ans: केरळमध्ये खासगी बसमधील प्रवासादरम्यान गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर संबंधित तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Ans: शिमजिथा मुस्तफा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने बसमधील गैरवर्तनाचा आरोप करत व्हिडीओ पोस्ट केला होता.
Ans: कुटुंबीयांनी आरोप फेटाळले असून गर्दीत चुकून धक्का लागला असल्याचा दावा केला आहे आणि न्यायाची मागणी केली आहे.






