
crime (फोटो सौजन्य: social media)
गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी काय माहिती दिली?
या प्रकरणात जे FIR आणि चौकशी अहवालांची प्रत आपण शासनाकडे पाठवली होती. शासनस्तरावर याची तत्काळ दखल घेऊन, संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्रीला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. असे गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे हे म्हणाले.
प्रकरण काय?
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात काम करणारी 45 वर्षीय कंत्राटी परिचारिका यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून सतत अश्लील मागणी आणि वेतन वाढ रोखण्यात आल्याने ती मानसिकदृष्ट्या ढासळली. तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिचा जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. तिच्या जबाबानंतर गडचिरोली पोलिसांनी सोमवारी उशिरा झिरो एफआयआर नोंदवत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याची गंभीर दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांच्यावर तातडीची कारवाई करण्यात आली आहे.मुंबई येथून संबंधित विभागाने त्यांचा निलंबनाचा आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
गडचिरोलीत मोठे यश! डीजीपी रश्मी शुक्लांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त नक्षलवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यासमोर बुधवारी (१० डिसेंबर २०२५) ११ वरिष्ठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या या नक्षलवाद्यांवर राज्य सरकारने मिळून एकूण ८२ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते.
वर्दी आणि शस्त्रे ठेवून आत्मसमर्पण
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या ११ नक्षलवाद्यांपैकी ४ जण वर्दीमध्ये होते आणि त्यांनी आपल्या शस्त्रांसह डीजीपींसमोर शरणागती पत्करली. इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण होणे, हे राज्य शासनाच्या नक्षलविरोधी धोरणाचे आणि आत्मसमर्पण प्रोत्साहन योजनेचे मोठे यश दर्शवते.
Ans: वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हॉट्सअॅपवर होत असलेल्या कथित अश्लील आणि त्रासदायक मागण्यांमुळे मानसिकदृष्ट्या ढासळून तिने विषप्राशन केला.
Ans: शासनाने तात्काळ निलंबित करत विभागीय चौकशीचे आदेश दिले. त्यांचे मुख्यालय गोंदिया येथे निश्चित करण्यात आले.
Ans: पोलिसांनी झिरो FIR नोंदवत डॉ. म्हाशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.