Gadchiroli Naxal News: गडचिरोलीमध्ये अकरा नक्षलवाद्यांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ₹८२ लाख बक्षीस होते. या वर्षी आतापर्यंत ११२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात आलेली 'हर घर जल' योजना अल्पावधीत बंद पडली. बंद असलेली पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
गडचिरोलीत आरोग्य विभागातील परिचारिकेने दोन वर्षांच्या मानसिक छळ, अश्लाघ्य मागण्या व वेतनवाढ रोखल्याच्या आरोपांमुळे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचला.
Gadchiroli the Rabi season : आधी अवकाळी पावसामुळे धोका, आता जंगली प्राण्यांमुळे शेतकरी संकटात पाहायला मिळत आहे. गडचिरोत पाचही वनविभागात जंगली प्राण्यांनी दहशत मांडून ठेवली.
रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील रूग्णांची सेवा देण्यासाठी ओळखले जाते आणि आता त्याच दर्जाची सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नक्षलग्रस्त लाहेरीजवळील चंगाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करीत गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर 'लाकडी पूल' उभारला. दरवर्षी ग्रामवासी श्रमदानातून आवश्यक गरज लक्षात घेत लाकडी पूल उभारत आले आहेत.
नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अहेरी एसटी आगाराच्या बस वाहकाचे शुल्लक कारणावरुन एका दुचाकी चालकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील या प्रस्तावित प्रकल्पांतून ९०,३०० लोकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अक्षय्य व अपारंपरिक ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाले.
गडचिरोलीत नक्षलवाद्यां विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गडचिरोलीत चार नस्खलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश…
गडचिरोलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रॅकने ६ मुलांना चिरडले असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे.
Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस आणि शासन प्राधान्य देताना पाहायला मिळत आहेत.
शाश्वत शेतीला चालना देऊन, उपजिविकेच्या संधी वाढवून आणि जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधणे ही प्रमुख उद्दिष्टे असून प्रमुख उपक्रमांद्वारे ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.
यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून हत्तीपायाचे 3026 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. हत्तीपायाच्याडासांचा दंश झाल्यानंतर थोडा ताप येतो. पण 18 महिन्यांपर्यंत ठळक लक्षणे दिसत नाहीत.
नुकत्याच झालेल्या प्राणी जनगणेत या प्रकल्पात 63 वाघ आढळून आल्याने व्याघ्र दर्शनाच्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी तुलनात्मक ताडोबात पर्यटकांची संख्या घटली आहे.
१० जूनला माओवाद्यांकडून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू चकमकीत हा मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.