Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार
काय नेमकं प्रकरण?
मृतक देवानंद याच २०१८ मध्ये आंधळी येथील रेखाशी प्रेमविवाह केला होता. सगळं व्यवस्थित आणि सुरळीत चाललं होत. नंतर रेखा राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या प्रेमात पडली. दोन महिन्यांपूर्वी तिने देवानंदचा संसार सोडला आणि ती कुरखेडा येथे विश्वजीतसोबत राहू लागली. देवानंदने तिला वारंवार घरी परतण्याचे आवाहन केले. तंटा मुक्ती समितीनेही मध्यस्थी केली. मात्र रेखाने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला.
वाद विकोपला आणि…
घटनेच्या दिवशी देवानंद हा रेखाला भेटण्यासाठी कुरखेडा येथे तिच्या भाड्याच्या घरात गेला. मात्र रात्री उशिरा या तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हळूहळू हा वाद विकोपाला आणि रेखा आणि विश्वजीतने मिळून देवानंदच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला. हा वार एवढा जोरदार होता की देवानंदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवर बसवून सती नदीच्या पुलाजवळ नेला. तिथे रस्ते अपघात वाटावा म्हणून मृतदेह फेकून दिले. दुचाकीची तोडफोड केली.
कसा झाला हत्येचा उलगडा
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना रक्ताच्या थेंबा दिसले. हत्येच्या ठिकाणापासून ते पुलापर्यंत रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या थेंबांनी या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कार्यवाही करत आहे.
Ans: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात.
Ans: पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे.
Ans: हत्येच्या ठिकाणापासून पुलापर्यंत आढळलेल्या रक्ताच्या थेंबांमुळे.






