उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील कुख्यात गुन्हेगार विनोद कुमा उपाध्यायला (Vinod Upadhyay) उत्तर प्रदेश एसटीएफने (Uttar Pradesh STF) सुलतानपूरमध्ये चकमकीत (Encounter) ठार केले. विनोदने स्वतःची संघटित टोळी तयार करून गोरखपूर, बस्ती, संत कबीर नगर, लखनौ येथे अनेक खळबळजनक हत्याकांड घडवून आणले होते. त्याच्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल ३५ गुन्हे दाखल होते, पण त्याला एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नव्हती.
[read_also content=”आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची कमाल! एक नव्हे, दोन नव्हे, ८५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटी रुपयांची नोकरी ऑफर https://www.navarashtra.com/maharashtra/iit-bombay-85-students-get-job-offor-of-1-crore-pa-nrps-495142.html”]
एसटीएफ मुख्यालयाचे डेप्युटी एसपी दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने उपाध्यायचा एन्काउंटर केला. विनोद उपाध्याय यांच्यावर गोरखपूर, बस्ती आणि संत कबीर नगरमध्येशुक्रवारी पहाटे एसटीएफच्या पथकाने त्याला घेरले असता त्याने पळून जाण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याने एसटीएफ टीमवर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर एसटीएफने त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळ्या घातल्या. गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.
एसटीएफ आणि गोरखपूर गुन्हे शाखेचे पथक उपाध्यायचा सात महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. विनोद उपाध्याय यांचा यूपीच्या टॉप 10 माफियांच्या यादीत समावेश होता. विनोद उपाध्याय हा अयोध्या जिल्ह्यातील पूर्वा येथील रहिवासी असून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूपी पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.






