नराधमांची हिंमत तर बघा...! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, जयपुरमधील न्यू सांगनेर रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला बाईक टॅक्सीवर मागे बसून घरी निघाली होती. याच वेळी तिच्या शेजारुन जाणाऱ्या दुचाकीवरील दोन तरुणांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मागचा तरुण महिलेची छेड काढत आहे, तिच्यासोबत गैरवर्तन करत आहे. या तरुणाने महिलेच्या पाठीवर अत्यंत गैरप्रकारे हात फिरवल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यावेळी महिला देखील तिचीछेड काढणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी बाईक टाक्सी कंपनीकडून तातडीने घटनेची माहिती घेतली. आरोपींचा शोध घेत मनराज मीना आणि सुदामा मीना अशी त्यांची ओळख पटवण्यात ईली आहे. सध्या पीडीतेने कोणतीही अधिकृत तक्रार दिलेली नाही. परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवरुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. सध्या या घटनेनंतर राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Two bike-borne youths allegedly harassed a woman on a city road here, with a video of the incident surfacing online and prompting police to launch a search for the accused. Deputy Commissioner of Police (South) Rajarshi Raj Varma said the video, which went viral on social media,… https://t.co/WsWssFaiYr pic.twitter.com/5LZBFmN4Hp — Hate Detector 🔍 (@HateDetectors) April 10, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @HateDetectors या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी आरोपींनी कडक शिक्षेची मागणी केली आहे. तसेच राजस्थानमधील वाढत्या गुन्हेगारीवरही टीका केली आहे. या व्हिडिओने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
Viral News : …अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






