Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापुरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार; दहा गॅस सिलेंडरसह कार जप्त, दोघे अटकेत

पोलिसांनी सदर कारची तपासणी केली असता कारमध्ये एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या सात तर व्यावसायिक वापराच्या तीन गॅस सिलेंडर टाक्या दिसून आल्याने पोलिसांनी सदर कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 03:37 PM
अनेक ठिकाणी गॅस टंचाई कायम; तीन आठवड्यांपासून सिलेंडर नाहीच, नागरिकांचे हाल

अनेक ठिकाणी गॅस टंचाई कायम; तीन आठवड्यांपासून सिलेंडर नाहीच, नागरिकांचे हाल

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरून बेकायदेशीरपणे व धोकादायक पद्धतीने गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना दहा गॅस सिलेंडर व कारसह पोलिसांनी जेरबंद केले असून, अशोक दिलीप पवार व अनिल तुकाराम चव्हाण असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे.

शिक्रापूर (ता.शिरुर) येथील चाकण चौक परिसरात पोलीस वाहतूक नियमन करत असताना अहिल्यानगर दिशेने एक कार बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलीस हवालदार मिलिंद देवरे, ट्राफिक वार्डन अमोल राऊत, जिंदावली जमादार, किरण थोरात, अनिल वाडेकर, सुरेंद्र वाटोरे यांनी सदर ठिकाणी सापळा लावला असता अहिल्यानगर बाजूने कार आल्याचे दिसून आली.

पोलिसांनी सदर कारची तपासणी केली असता कारमध्ये एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या सात तर व्यावसायिक वापराच्या तीन गॅस सिलेंडर टाक्या दिसून आल्याने पोलिसांनी सदर कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तर गॅस सिलेंडरबाबत कोणत्याची पावत्या बिले नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दोघांना कार व गॅस सिलेंडरसह ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस हवलदार मिलिंद दिलीप देवरे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अशोक दिलीप पवार (वय ३४ वर्षे रा. परडी माटेगाव ता. वडवणी जि. बीड) व अनिल तुकाराम चव्हाण (वय २१ वर्षे रा. जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.

अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा

आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा थेट परिणाम इगतपुरीतील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर झाला आहे. इंधनाअभावी तालुक्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, सुरू असलेल्या हॉटेल्सनी आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीत (मेनू) मोठी कपात केली आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून हॉटेल चालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस लाइफस्टाइल रिसॉर्ट, नर्मदा हॉटेल, साई प्लाझा, फूड प्लाझा यांसारख्या मोठ्‌या आणि नामवंत हॉटेल्समध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.

MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

Web Title: Gas cylinder black marketing in shikrapur car seized along with ten gas cylinders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • lpg cylinder
  • pune news

संबंधित बातम्या

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?
1

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?

ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा; दोन वर्षांत 4.39 लाख वाहन परवाने वितरित
2

ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा; दोन वर्षांत 4.39 लाख वाहन परवाने वितरित

Pune Water Crisis : उन्हाच्या तडाख्यात पुण्यात पाणी टंचाई; अनेक गावे, वस्त्या टँकरच्या भरोशावर, ‘या’ गावाला सर्वाधिक झळ
3

Pune Water Crisis : उन्हाच्या तडाख्यात पुण्यात पाणी टंचाई; अनेक गावे, वस्त्या टँकरच्या भरोशावर, ‘या’ गावाला सर्वाधिक झळ

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश
4

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.