Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरसेवक करणार ‘ड्रग्ज मुक्त प्रभाग’! पुणे पोलीस आयुक्तांचा महत्वकांक्षी उपक्रम

पुण्यातून ड्रग्जला हद्दपार करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना 'माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त' या उपक्रमाशी जोडण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2026 | 01:20 PM
नगरसेवक करणार 'ड्रग्ज मुक्त प्रभाग'! पुणे पोलीस आयुक्तांचा महत्वकांक्षी उपक्रम

नगरसेवक करणार 'ड्रग्ज मुक्त प्रभाग'! पुणे पोलीस आयुक्तांचा महत्वकांक्षी उपक्रम

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून ड्रग्जला हद्दपार करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ या उपक्रमाशी जोडण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्यात चार प्रभागात हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार, संबंधित भागात एकाही ठिकाणी ड्रग्ज विक्री, बाळगणे किंवा कोणी ड्रग्ज पिणार नाही, याची जबाबदारी पोलिसांसह नगरसेवक पार पाडणार आहेत.

 

विद्येच्या माहेर घरात गेल्या काही वर्षात ड्रग्जचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी देशामधील तसेच आंतरराष्ट्रीय रॅकेटही उघडकीस आणले. तर, शहरातील पुरवठा साखळी मोडीत काढण्यासाठी पावले उचलली. यानंतर देखील शहरात आधून-मधून ड्रग्ज येत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. विशेषत: गांजा व एमडी या ड्रग्जचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच पोलिस आयुक्तांच्या नगरसेवकांच्या जनता दरबार बैठकीत नगरसेवकांनी त्यांच्या भागात सुरू असलेल्या ड्रग्जबाबत धक्कादायक माहिती मांडली. त्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून सातत्याने ड्रग्ज मुक्त शहरासाठी ठोस पावले उचलली जात असताना पुन्हा अशा घटना समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता थेट नगरसेवकांना ड्रग्ज मुक्तीसाठी सहभागी करून घेण्यात येणार आहे. आता प्रभाग मुक्त ड्रग्ज असा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रायोगित तत्त्वावर पहिल्या टप्यात चार प्रभागात हा उपक्रम राबवून येथे ड्रग्जची विक्री, बाळगणे किंवा तो कोण-कोण पितो, यासंदंर्भात माहिती ठेवून पोलिसांसोबत ते उघड करणार आहेत.

पीटीपी अ‍ॅपच्या धर्तीवर ड्रग्जचेही अ‍ॅप

वाहतूक नियमभंगाचे फोटो पाठविण्यासाठी पुणे पोलिसांनी विकसीत केलेल्या पीटीपी अ‍ॅपच्या धर्तीवर आता ड्रग्ज विरोधीही असेच पीटीपी अ‍ॅप तयार केले जाणार आहे. ज्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिक थेट फोटो, व्हिडीओ व लोकेशन पोलिसांना पाठवू शकणार आहेत. विशेष म्हणजे, माहिती पाठविणाऱ्याची माहिती अत्यंत गुप्तता पाळली जाणार आहे. जेणेकरून ड्रग्जला ब्रेक लागेल.

हे सुद्धा वाचा : पुणे ‘झेड’पी विषय समित्यांच्या सभापतींची निवड या महिन्यात होणार; पारदर्शक प्रक्रिया पार पडणार

स्थानिक पोलिस ठाण्यात अँटी ड्रग्जविरोधी पथक

ड्रग्ज मुक्तीसाठी आता पोलिस आयुक्तांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात अँटी ड्रग्जविरोधी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पथक फक्त ड्रग्ज विरोधात कारवाई करणार आहे. पहिल्या टप्यात शहरातील ठरावीक दहा पोलिस ठाण्यात या स्कॉडची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील ४४ पोलिस ठाण्यात हे पथक स्थापन केले जाणार आहे.

Web Title: Pune police commissioner amitesh kumar has decided to implement an ambitious initiative to make pune city drug free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
4

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.