Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

मांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान अंडे फेकल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 01, 2025 | 10:36 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मीरा रोड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मीरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान अंडे फेकल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात काशिमिरा पोलिसांनी बी.एन.एस. 2023 कलम 300 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

नेमकं काय घडलं?

मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सोसायटीत गरबा कार्यक्रम सुरु सुरु होता. त्यावेळी एस्टेला बिल्डिंगमधील एक रहिवासी व्यक्ती हातात मोबाईल घेऊन त्याठिकाणी आला. त्याने डेसिबल लेव्हल तपासले तसेच गरबा खेळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ काढून ते पोलिसांना दाखवत होता. यापूर्वी देखील त्याने अनेक वेळा पोलिसांना फोन केला आणि कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रात्री १०.५० वाजता एस्टेला बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरून त्या व्यक्तीने खाली काहीतरी फेकल्याचे एका नागरिकांनी सांगितले. काही वेळातच दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ अंडे फुटलेल्या अवस्थेत आढळले. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.

गुन्हा दाखल

या कृत्यामागे तोच व्यक्ती असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्याच्या विरोधात शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे तसेच विविध हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात धावावं घेतली. नागरिकांच्या दबावानंतर काशिमिरा पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरुद्ध धार्मिक उपासना सुरु असतांना जमावास व्यत्यय आणल्याप्रकरणी बी.एन.एस. 2023 कलम 300 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली असून पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्याचे ठरवले आहे. त्या व्यक्तीने यापूर्वीही बकरी ईदच्या निमित्ताने झालेल्या वादामुळे रहिवाशांशी सतत वाद घातले असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे काय म्हणाले?

याबाबत शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांंनी म्हटलं की, भाईंदर शहरामध्ये खूप निंदनीय प्रकार झाला आहे. मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत हा निंदनीय प्रकार झाला आहे. आज राज्यभर नवरात्र उत्सव साजरा होत आहे. त्याचबरोबर मीरा-भाईंदर शहरांमध्ये, मुंबई असू द्या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये लोकं साजरा करत आहेत. पण आज मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत खाली गरबा सुरू असताना सोळाव्या मजल्यावरून समाजकंटकाने अंडी फेकली. ही गोष्ट मला काही लोकांनी फोनवरून सांगितली.

इथल्या स्थानिकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केले सरनाईक यांचा मला फोन आला. त्यांनी आम्हाला सांगितलं तिथे जावा आणि पहा काय झालं आणि मला परिस्थिती सांगा काय आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा पाहिलं तर खाली अंड्याचे कवच खाली पडले होते. समाजकंटकाने गरबा खेळत असताना विशेष म्हणजे जिथे पोलीस होते, पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांनी हा प्रकार केला आहे. त्यानंतर मी पोलिसांना, वरिष्ठांना फोन केला. जे काही घडलं आहे ते पोलिसांच्या समोर घडले आहे. त्यांच्यावरती कारवाई करा, जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक इथून हालणार नाही असे आम्ही त्यांना सांगितलं. चार साडेचार वाजता त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला आहे.

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

 

Web Title: Ggs thrown from the 16th floor at citizens playing garba incident at mira road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • crime
  • Mira Road
  • Mumbai Crime
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या
1

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं
2

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार
3

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार

Chattisgarh Crime: सासऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तब्बल १३४ कोटींचे शेअर्स हडप; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
4

Chattisgarh Crime: सासऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तब्बल १३४ कोटींचे शेअर्स हडप; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.