फोटो सौजन्य सोशल मिडिया
आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमध्ये पती-पत्नीच्या नात्याला पुन्हा एकदा कलंक लागला आहे. ज्या पतीसोबत सात जन्मांची सोबत राहण्याची शपथ घेतली होती. त्या पतीच्या हत्येचा कट पत्नीने तिच्या प्रियकरा बरोबर केला. जो एक जिम ट्रेनर आहे. त्याचे नाव प्रताप सिंग असल्याचे सांगितले जात आहे.
पत्नी प्रियाने जिम ट्रेनर प्रताप सिंह सोबत मिळून पती शंशाक कंथेरिया वर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा पोलिसांनी 24 तासाच्या आता छडा लावून या घटनेतील आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी प्रताप सिंह हा एक जिम ट्रेनर आहे, जिथे पुरुष आणि महिला दोघेही व्यायामासाठी येतात. आरोपी महिला प्रिया ही गेली आठ महिन्यांपासून जिममध्ये जात होती.याच काळात तिथे हे दोघेही मित्र बनले आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ आले. या दोघांनाही लग्न करायचे होते.अशी माहिती मिळत आहे.
#गाजियाबाद के वसुंधरा में रिश्तों को झकझोरने वाली वारदात! पहली शादी के बाद दूसरी लव मैरिज, फिर जिम ट्रेनर से प्रेम संबंध।पुलिस के मुताबिक, पति को रास्ते से हटाने की कथित साजिश के तहत उस पर चाकू से कई वार किए गए। पत्नी और जिम ट्रेनर गिरफ्तार
#Ghaziabad #CrimeNews #LoveAffair #ncr https://t.co/PiMhyOivUU — mayank gaur (@GhaziabadMayank) October 27, 2026
आरोपी महिला प्रियाचा पती शंशाक कंथेरिया हा एक वरिष्ठ लेखापाल होता. जिम ट्रेनर प्रताप सिंह अनेक वेळा त्याच्या घरी येत जा करत असे,या दरम्यान तिच्या पतीला त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल समजले होते. यानंतर, तिने दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहायला जाण्याचे ठरवले.
मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑक्टोबरच्या सकाळी जेव्हा ती प्रिया जिम ट्रेनर प्रताप सिंह याला भेटली, तेव्हा त्या दोघांनी मिळून तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला. पण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हत्येचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी जिम ट्रेनर प्रताप सिंह हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना शेजाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सुदैवाने, गंभीर जखमी झालेल्या शशांक कंथेरिया याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तपास करून पत्नी प्रिया आणि जिम ट्रेनर प्रताप सिंह दोघांनाही अटक करण्यात आली आहे.






