Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत... मिळणार हे फीचर्स
स्मार्टफोनच्या पलीकडे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), फोटोग्राफी, प्रवास, गेमिंग, क्रीडा आणि जीवनशैली अशा विविध विषयांमध्ये रुची असलेल्या व्यक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने कंपनीने हे नवीन ॲप लाँच केले आहे. ‘ट्राइब्स’ (Tribes) हे ॲपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे एक समुदाय आहे जे समान आवडीनिवडी आणि छंद असलेल्या लोकांना एकत्र आणतात. यूजर्स स्वत:चे प्रोफाईल तयार करू शकतात, कंटेट प्रकाशित करू शकतात, चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतात, समुदायातील आपली ओळख निर्माण करू शकतात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपले विचार पोहोचऊ शकतात. हे सर्व नव्या ॲपच्या माध्यमातून शक्य होणार आहे.
ॲपमध्ये ‘व्हाइब चेक’ (Vibe Check), ‘हॉट टेक’ (Hot Take) आणि ‘डीप डाइव्ह’ (Deep Dive) असे संवादात्मक पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे सदस्यांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. मतदानाच्या माध्यमातून मते जाणून घेणे, विविध विषयांवर आपले मत मांडणे आणि सविस्तर लेखांद्वारे विषयांचा सखोल अभ्यास करणे, अशा सुविधा या पर्यायांमधून उपलब्ध होतील.
मोटोरोलाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक टी. एम. नरसिंहन यांनी सांगितलं की, मोटोरोलामध्ये, आमचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की तंत्रज्ञानाने लोकांना एकमेकांशी जोडले जाण्यास आणि त्यांचे विचार व्यक्त करण्यास सक्षम केले पाहिजे. ‘मोटोरोलर्स’च्या माध्यमातून आम्ही एक असे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत, जिथे आमचे यूजर्स, चाहते आणि तंत्रज्ञानप्रेमी एकत्र येऊ शकतात, त्यांच्या आवडीनिवडी शेअर करू शकतात, विचारांची देवाणघेवाण करू शकतात आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करू शकतात.
मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा
‘मोटोरोलर्स’ ॲप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या समुदायात सहभागी होण्यासाठी आणि ‘मोटोरोलर्स’ बनण्यासाठी यूजर्स हे ॲप डाउनलोड करू शकतात.






