crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबईतल्या जोगेश्वरी भागातील २५ वर्षीय तरुणीने दोन हजार रुपयांचं ऑनलाईन कर्ज घेतलं होत. हे ऑनलाईन कर्ज परतफेड करत असतांना तिची फसवणूक करण्यात आली आणि धक्कदायक घटना म्हणजे त्या तरुणीचे फोटो वायरल करण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने कॅश लोण नावाचं अँप डाउनलोड केलं होत. त्यात तिने सगळी माहिती अपलोड केली होती. २०जुलै २०२५ला दोन हजार रुपयांचं कर्ज मागितलं होतं मात्र तिला १३०० रुपये देण्यात आले. हे कर्ज अवघे ६ दिवसांसाठी होते. मुदत संपायच्या आधीच तिला पैसे परत करण्यासाठी मेसेज येऊ लागले. तिला पैसे जर परत केले नाहीत तर तुझे अश्लील फोटो बनवून वायरल करण्याची धमकी देण्यात आली.
Pune Crime News: आधी मारहाण, मग अपहरण; मुलीच्या घरच्यांनी केलं जावयाचं अपहरण
धमकी देऊन केले फोटो वायरल, नेमकं काय झालं?
फोटोत चेहरा ब्लर करून नग्न अवस्थेतील फोटो मुलीच्या मावशीच्या व्हाट्सअप वरती आणि तिच्या दोन मित्रांना पाठवण्यात आले. हे फोटो तिचा असल्याचं भासवण्यात आलं. या घटनेनं तरुणी पूर्ती हादरून गेली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठलं. ज्या खात्यात हे पैसे जमा झाले संदेश कुमार असं खातेधारकाचं नाव आहे. या मुलीने १ हजार रुपये परत केले मात्र ऑनलाईन फसवणुकीची ही मुलगी शिकार ठरली.
मुलीला कर्ज किती हवं होत ?
पैश्यांची तातडीची गरज असल्याने मुलीने दोन हजार रुपयांचा ऑनलाईन अँपवरून कर्ज मागितला होता. मात्र त्यातले अवघे १३०० रुपये मिळाले आणि मुदतीच्या आतच तीला फोटो वायरल करण्याची धमकी देण्यात आली. मावशीच्या आणि मित्राच्या व्हाट्सअँपवर फोटो गेल्याने ही मुलगी घाबरून गेली. प्रत्यक्षात हे तिचे फोटो नव्हते तिला दुसऱ्या फोटोच्या आधारे धमकी देण्यात आली.
ऑनलाईन फसवणूक कशी टाळाल ?
कोणताही ऑनलाईन कर्ज घेतांना त्या अँपची खात्री करा.
खात्री केल्याशिवाय आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
जर कदाचित तुमची फसवणूक होत असेल पोलीस ठाण्यात तक्रार द्या.
ऑनलाईन अँपच्या कर्जाचा मोह टाळा.
बायकोसमोरच भाऊजींनी मेहुणीवर केला बलात्कार! वर्षभरात घरीच मुलाला जन्म
मुंबई़त नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. मोठ्या बहीणच्या नवऱ्यानेच मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईत एका ४० वर्षीय आरोपीने मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीलाही अटक केली. पत्नीवर पतीचा गुन्हा लपवण्याचा आणि घरी बहिणीची प्रसूती केल्याचा आरोप आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करावे लागल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
हडपसर पोलिसांची विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई; फक्त 24 तासात…