girl walking alone in Lonavala was sexually assaulted in a car Vadgaon Maval Crime News
Marathi Crime News : वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने एकट्या जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. सदर घटना शुक्रवारी (ता. २५ जुलै) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली येथे घडली आहे. या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. याबाबत पीडित तरुणीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील तुंगार्ली गाव परिसरातून ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी निघाली हाेती. पीडित तरुणीला गाडीतून आलेल्या तिघांनी धमकावले. तिला धमकावून गाडीमध्ये बसण्यास सांगितले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तरुणीचे हात-पाय बांधले. तरुणीला गाडीतून वेगवेगळ्या भागात नेण्यात आले. गाडीमध्ये तिच्यावर तिघांनी बलात्कार केला, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तरुणीला नांगरगाव परिसरात वाटेमध्ये सोडून गाडीतून आरोपी पसार झाले. तेथे घाबरलेल्या अवस्थेत तरुणी थांबली हाेती. स्थानिक रहिवाशांनी तरुणीला जवळच्या एका मंदिरात सुरक्षित नेले. त्यानंतर रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करून जबाब नोंदवला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोकाटे आणि कदम यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकर्यांबाबत असंसदीय भाषा वापरतात, विधानसभेत रमीचा खेळ खेळतात, शासन भिकारी असल्याचे सांगतात, गृहराज्यमंत्री योगेश कदम डान्सबार चालवतात अशी व्यक्ती मंत्री म्हणून राहण्यास पात्र नाही. कदम व कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, तसेच मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी मावळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब फाटक भारत ठाकुर,आशिष ठोंबरे भरत होते शांताराम भोते, बाळासाहेब शिंदे, उमेश गावडे, राहुल नखाते,अनिल ओव्हाळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच गृ यांनी राज्यातील शेतकर्यांबद्दल असंसदीय भाषा वापर करणे, पंचनाम्यासाठी अरेरावीची भाषा करणे, अधिवेशन सुरू असताना चक्क सभागृहात मोबाईलवर रमी खेळणे, वारंवार बेजबाबदार वक्तव्ये करणे, यामुळे शेतकरीव महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कोकाटे यांच्या या अशोभनीय कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.अशी बेजबाबदार व अहंकारी व्यक्ती राज्याच्या मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्सबार चालतो अशा वादग्रस्त मंत्र्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी
याबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मावळ तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे