Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू राज ठाकरेंच्या घरी जा, मी तुला विकत घेऊ शकतो; अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाची हुल्लडबाजी

एका मराठी महिलेसोबत मनसेच्या नेत्याच्या मुलाने हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आले आहे. त्याने दारू  पियुन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालत एका मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या गाडीला धडक देत तिच्याशी हुज्जत घातली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2025 | 09:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: एका मराठी महिलेसोबत मनसेच्या नेत्याच्या मुलाने हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आले आहे. त्याने दारू  पियुन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालत एका मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या गाडीला धडक देत तिच्याशी हुज्जत घातली. तसेच, इन्फ्लुएन्स व मॉडेलला शिवीगाळ करत पैशाचा आणि आपले वडिल मनसेचे नेते असल्याचा माजही दाखवला होता.

50 हजार रुपये दे, नाहीतर…; बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी

हा प्रकार मनसे (MNS) प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहील शेखने केला आहे. त्याने दारू ओपियुन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालून मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देत तिच्याशी हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्याने राजश्री मोरेला पैश्याचा आणि आपले वडील मसनेचे नेते असल्याचा मजाही दाखलवा. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात मध्य रात्री 1 वाजता घडली. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. मनसेच्या वतीने पत्रक काढून संबंधित मुलाचा माणसे पक्षाशी काहीही संबंद नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मनसेचे नेते जावेद शेख यांच्या मुलांना राहील जावेद शेखविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहील शेख याने दारूच्या नशेत राजश्रीसह पोलिसांना देखील दम दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला आंबोली पोलीस स्टेशनमध्ये नेले असता, पोलीस ठाण्यातही त्याने रात्रभर धिंगाणा केल्याची माहिती समोर आली आहे.

जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा संशय- राजश्री मोरे

तो मुलगा उद्धटपणे बोलत होता, सातत्याने माझा बाप कोण आहे हे तुला माहिती नाही. तू ठाण्यात जा, माझा बाप मनसेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. तू राज ठाकरेंच्या घरी जा, तुझ्या गाडीचा खर्च तिथून घे. असे तो दारुच्या नशेतील मुलगा माझ्याशी बोलत होता. मी तुला विकत घेऊ शकतो, तुझ्याकडे नसेल तेवढा पैसा मी तुला देऊ शकतो, असे म्हणत तो आरोपी घाण-घाण शिवीगाळ करत होता, असेही राजश्री मोरेने म्हटले. दरम्यान, राजश्री मोरे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनात व्हिडिओ ट्विट केल्यामुळे मनसेकडून राजश्री मोरेला धमकी देण्यात आल्याचा आरोपही तिने केला होता. तसेच, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय देखील तिने व्यक्त केला आहे.

मनसेच्या पत्रकात काय?

जावेद शेख हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या मुलाने जे कृत्य केले आहे, त्याच्याशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. त्या कृत्याचे समर्थन आमचा पक्ष करत नाही. संबंधित पोलीस यंत्रणांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती, असे परिपत्रक मनसेच्यावतीने मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काढले आहे. त्यामुळे, याप्रकरणी मनसेकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली असून संबंधित राहिल शेखवर कारवाई करण्याचे स्पष्टपणे सूचवले आहे.

पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या; चोरट्यांनी एकाला रस्त्यात अडवले अन्…

 

Web Title: Go to raj thackerays house i can buy you mns leaders son makes a ruckus while half naked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 07:54 AM

Topics:  

  • crime
  • maharashtra navanirman sena
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025: आता उशिरापर्यंत करा गणेश दर्शन! मुंबई मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, ‘या’ मार्गावरील सेवा वाढवली
1

Ganesh Chaturthi 2025: आता उशिरापर्यंत करा गणेश दर्शन! मुंबई मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, ‘या’ मार्गावरील सेवा वाढवली

Palghar : एक गाव, एक गणपती , उर्से गावाची 53 वर्षांची परंपरा
2

Palghar : एक गाव, एक गणपती , उर्से गावाची 53 वर्षांची परंपरा

Dhule Crime: साधूचा वेष घेऊन रस्त्यावर लूट, उत्तराखंडातील पाच दरोडेखोर धुळे पोलिसांच्या जाळ्यात
3

Dhule Crime: साधूचा वेष घेऊन रस्त्यावर लूट, उत्तराखंडातील पाच दरोडेखोर धुळे पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime: संतापजनक! तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत; मुंबईतील घटना
4

Mumbai Crime: संतापजनक! तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत; मुंबईतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.