
crime (फोटो सौजन्य: social media)
पीडिता पती आणि २ लहान मुलांसह पाचपावली ठाण्यांतर्गत राहते. पती मजूर असून नेहमी बाहेर असतो. गत महिन्यात पीडितेला पैशांची आवश्यकता होती. एका व्यक्तीच्या माध्यमातून तिने भूपेशकडून २ हजार रुपये उसणे घेत ८-१० दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत संपूनही पैशांची व्यवस्था होऊ शकली नाही. शनिवारी सायंकाळी पीडिता मुलांसह घरी एकटी होती. पती कामावर गेला होता. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भूपेश पीडितेच्या घरी आला आणि उसणे घेतलेली रक्कम परत मागितली. महिलेने पती कामावरून परतल्यानंतर पैसे देण्याचे आश्वासन दिले.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
भूपेशने महिला घरी एकटी असल्याची संधी तिच्याशी चाळे साधून अश्लील करण्यास सुरुवात केली. जबरीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पीडितेचा पतीही घरी परतला, त्याने भूपेशला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पसार झाला. महिलेने पतीसोबत पाचपावली ठाणे गाठले. पोलिसांनी अत्याचाराचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. न्यायालयाने भूपेशची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एक ठार; सरपण गोळा करणे जीवावर बेतले
सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना चंद्रपूर वनपरीक्षेत्रातील पायली-भटाळी जंगलात रविवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली. बाबा नारायण गेडाम (५४, रा. चिंचोली ता. चंद्रपूर) असे मृताचे नाव असून ते रविवारी सकाळी दुर्गापुरलगतच्या पायली-भटाळी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळी घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. जंगलात त्यांची सायकल व वाघाने ओढत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. वनविभागामार्फत शोध घेतला असता रात्री ११ वाजता त्यांचा मृतदेह छिन्नविच्छीन अवस्थेत आढळला.
Ans: उसणे दिलेल्या पैशांच्या वादातून आरोपीने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला.
Ans: तिनं ताबडतोब पोलिसांकडे तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला.
Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी मिळवली.