Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंदेकर टोळीसोबत वाद, सोमनाथ गायकवाडशी मैत्री; ‘असा’ आहे सुरज ठोंबरेचा गुन्हेगारी इतिहास

सुरज ठोंबरे नाना पेठेत लहानाचा मोठा झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याची सोमनाथ गायकवाडशी मैत्री झालेली. ठोंबरेचा गुन्हेगारी इतिहास सविस्तर वाचा...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 01:46 PM
आंदेकर टोळीसोबत वाद, सोमनाथ गायकवाडशी मैत्री; 'असा' आहे सुरज ठोंबरेचा गुन्हेगारी इतिहास

आंदेकर टोळीसोबत वाद, सोमनाथ गायकवाडशी मैत्री; 'असा' आहे सुरज ठोंबरेचा गुन्हेगारी इतिहास

Follow Us
Close
Follow Us:
  • आंदेकर टोळीसोबत वाद
  • सोमनाथ गायकवाडशी मैत्री
  • वाचा सुरज ठोंबरेचा गुन्हेगारी इतिहास
पुणे/अक्षय फाटक : एकाच गँगमध्ये काम करणारे किरकोळ वादानंतर वेगवेगळे झाले अन् दोघांनी दोन स्वतंत्र टोळ्या देखील निर्माण केल्या. या टोळ्यां फक्त निर्माण झाल्या नाही तर त्यांनी दहशत देखील माजवली. ज्या टोळीत वाढ झाली, त्याच टोळीशी आता दोन्ही टोळ्या भिडत असल्याचे गुन्हेगारीतील वास्तव्य आहे. या टोळी युद्धाने शहर रक्तरंजित होत असताना सुरेज ठोंबरे टोळी देखील या रक्तरंजीत खेळाच्या किनाऱ्यावर उभी आहे. अल्पवयीन मुलांसह तरुणांईला गुन्हेगारीच्या दलदलित ओढले जात असताना यंत्रणा मात्र काही झाल्याशिवाय किंवा केल्याशिवाय हात टाकत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे टोळीचा परिघ वाढवताना गुन्हेगारीच्या सावटातूनच एका संघटनेत प्रवेश केल्याच्या प्रकरणाने सुरज ठोंबरे पुन्हा एकदा चर्चेत आला.

सुरज ठोंबरे नाना पेठेत लहानाचा मोठा झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याची सोमनाथ गायकवाडशी मैत्री झालेली. या मैत्रीनंतर सुरजला शिक्षणासाठी सोमनाथने आर्थिक मदत केली. दोघेही लहानपणापासूनचे मित्र. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सुरजने देखील शिक्षण सोडले. सोमनाथसोबतच स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर हे बंडू आंदेकरचे भाच्चे व टोळीचे सक्रिय सदस्य सुरजचे मित्र. मित्र परिवार जमा केल्याने सुरज अधून-मधून सोमनाथकडे मुल घेऊन जात असत. पण, ही गोष्ट आंदेकर टोळीच्या डोळ्यात खुपत होती. तशी पहिल्यापासून सुरजकडे मित्र मंडळी मोठी होती.

वादाची पहिली ठिंणगी

सुरज ठोंबरेचा मित्र रूपेश कदम याला आंदेकर टोळीतील ओंमकार साळुंखे व इतरांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली. ही मारहाण सुरज ठोंबरेला सहन झाली नाही. त्याने लागलीच वर्षभरात २०१८ मध्ये ओंमकार साळुंखे याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. त्यापुर्वी आंदेकर टोळीतील मुनाफ पठाण व इतरांनी ठोंबरेचा मित्र आकाश सासवड उर्फ स्काय याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्याचा अंगठा तुटला होता. या सर्वातून सुरज व आंदेकर टोळीत खटके उडू लागले आणि सुरज ठोंबरे वेगळा झाला.

मुलं उभे राहिले नाहीत

गुन्हेगारी विश्वात देखील भाई आल्यानंतर उठून उभे राहणे आणि पाया पडण्याची रित आहे. त्यानूसार, एका कार्यक्रमासाठी नाना पेठेतील एका भागात बंडू आंदेकरसह काहीजन उद्घाटन करण्यासाठी आले होते. ते येण्यापुर्वी सुरज ठोंबरेचे मित्र काही बसलेले होते. पण, ते बंडू आंदेकर आल्यानंतर उठले नाही. परंतु, त्याचवेळी सुरज ठोंबरे येताच सर्वजन उठून उभा राहिले. या गोष्टीचा आंदेकर गँगला मोठा राग आला. कृष्णा आणि वाडेकर बंधूनी यावरून वाद घालत या मुलाशी भांडण देखील केले. हे वाद झाल्यानंतर सुरज ठोंबरेने आंदेकर टोळीतील अक्षय आकोलकर याला हाताने मारहाण केली.

आंदेकर व ठोंबरेत वर्चस्वाला सुरूवात

सातत्याने होणारे किरकोळ वाद. मुलांमधील भांडण, सुरज ठोंबरेचे वाढत चाललेले वजन यावरून आंदेकर व ठोंबरेत दुश्मनी वाढत गेली. त्यात सुरज ठोंबरेकडून त्याच्या मित्रांशी कृष्णा व वाडेकर बंधूनी केलेल्या वादातून अक्षय याला भर चौकात केलेली मारहाण यामुळे दोन्ही टोळ्या स्वतंत्र झाल्या आणि दोन्ही टोळ्यात वर्चस्वाला सुरूवात झाली. हा काळ होता, २०१९-२० चा.

सुरज ठोंबरे व गायकवड टोळीचे मिलन

आंदेकर टोळीचे सुरज ठोंबरेसोबतच दुसरीकडे गायकवाड याच्याशी देखील वादविवाद सुरू होते. तो देखील वेगळा झाला होता. या गोष्टीनंतर आंदेकरशी पंगा घेण्यासाठी जुने मित्र असलेले सुरज ठोंबरे व सोमनाथ गायकवाड हे एकत्र झाले. दोघे एकत्र झाल्याने आपसूकच त्यांची ताकद देखील वाढली. त्यांनी डोके तालीम परिसरातच आंदेकर टोळीतील आदित्य उकिरंडे याच्यावर हल्ला करत त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का कारवाई केली.

आंदेकर टोळीकडून बदल्यातून गोळीबार

टोळीतील सदस्यावर झालेल्या हल्यानंतर आंदेकर टोळीकडून त्याच दिवशी रात्री फरार असलेल्या ठोंबरेचा ठावठिकाणाचा शोध घेत कोंढवा परिसर गाठला. सुरज ठोंबरे समजून त्यांनी गोळीबार देखील केला. पण, विघ्नेश गोरे हा तरुण गोळीबाराच्या समोर आला. थोडक्यात तो बचावला गेला होता. याप्रकरणात कृष्णा व इतरांवर गुन्हा नोंदवून मोक्का कारवाई केली गेली.

सुरज ठोंबरे जामीनावर बाहेर

आदित्य उकिरंडे याच्या खूनाच्या प्रयत्नात कारागृहात असलेला सुरज ठोंबरे २०२१ मध्ये कारागृहातून जामीनावर बाहेर आला. पण, न्यायालयाने त्याला पुण्यात येण्यास मनाई केली. तेव्हापासून सुरज ठोंबरे हा पुण्याच्या बाहेर राहून टोळीच्या संपर्कात आहे.

पुण्यात आगमन ते थेट संघटनेत प्रवेश

पुण्याच्या बाहेर राहून देखील पुण्यावर लक्ष ठेवणाऱ्या सुरज ठोंबरे याचे गेल्या काही वर्षात मध्यभागात मोठे वर्चस्व निर्माण झाले आहे. शेकडो मुलांच्या संपर्कात असलेला सुरज ठोंबरने डेक्कन परिसरातील एका संघटनेच्या कार्यक्रमात हजेरी लावली. ही हजेरी नव्हती, तर संघटनेत प्रवेश आणि शक्तीप्रदर्शन होते. पण, त्यापुर्वीच पोलिसांना याची भनक लागली आणि सुरज ठोंबरे याला तेथून काढता पाय घ्यावा लागला. हा क्षण देखील एखाद्या चित्रपटाला शोभावा असा घडल्याचे काहीजन सांगतात. शेकडो मुले घेऊन सुरज ठोंबरे या कार्यक्रमाला आला होता.

सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड

सुरज ठोंबरेच्या टोळीत पोलिसांच्या नोंदीत २३ जण सक्रिय आहेत. ही सर्व मुल २५ च्या आतील आहेत. दुसरीकडे गायकवाड याच्या टोळीत मध्यभागातील तसेच आंबेगाव पठारावरची मुल आहेत. ते देखील २५ च्या आतील आहेत. टोळीत सहभागी झालेले अनेक मुलांची नावे देखील पोलिसांच्या नोंदीत नाहीत. एखादा गुन्हा घडल्यानंतरच पोलिसांना ही मुले यांच्या टोळीत सक्रिय असल्याचे स्पष्ट होत असल्याने पोलिसांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे.

Web Title: Goon suraj thombre has committed many crimes in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना
1

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…
2

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास
3

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
4

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.