Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई

राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशातच आता सासरकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही घटना १७ ऑक्टोबरला लोणीकंदजवळील भरतवाडी, पिंपरी सांडस गावात घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2026 | 06:42 PM
सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई

सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
  • लोणीकंदजवळील पिंपरी सांडसमधील घटना
  • पोलिसांनी तिघांना केली अटक
पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशातच आता सासरकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही घटना १७ ऑक्टोबरला लोणीकंदजवळील भरतवाडी, पिंपरी सांडस गावात घडली. माहेरहून पैशांची मागणीसह कौटुंबिक छळ होत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.

हिना असिफ पटेल (वय २१ रा. भरतवाडी, पिंपरी-सांडस, बागवान वस्ती, हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती आसिफ मशाक पटेल (वय २५) साहेरा  बेगम मशाक पटेल (सासू, वय ४२)  सिदीप मशाक पटेल (दीर, वय २३) यांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. तर नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीम मुसा शेख (वय ४० रा. मातोजीनगर, पिंपरी-चिंचवड) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार शमीम शेख यांची मुलगी हिना आणि आसिफ यांचा ३० मे २०२४ रोजी निकाह झाला होता. त्यानंतर हिना सासरी नांदत असताना काही महिन्यांनी आरोपींनी तिला त्रास द्यायला सुरूवात केली. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरु केला. सततच्या त्रासाला कंटाळून हिनाने १७ ऑक्टोबरला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह दीर, सासूला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

नांदेडमध्येही विवाहितेची आत्महत्या

माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली विष्णुनगर येथे घडली आहे. अश्विनी महेश भुसारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश नारायण भुसारे, विशाल नारायण भुसारे आणि प्रयागबाई नारायण भुसारे यांनी संगनमताने अश्विनी यांच्याकडे माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावला. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ गोपाळ नामदेव नाटकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: हिना असिफ पटेल हिने १७ ऑक्टोबर रोजी लोणीकंदजवळील भरतवाडी, पिंपरी-सांडस गावात राहत्या घरी आत्महत्या केली.

  • Que: विवाहितेचा छळ कोणत्या कारणावरून होत असल्याची तक्रार आहे?

    Ans: माहेरहून पैशांची मागणी करून हिना हिचा सासरच्या मंडळींकडून सतत कौटुंबिक छळ होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: या प्रकरणात पोलिसांनी हिचा पती आसिफ मशाक पटेल, सासू साहेरा बेगम मशाक पटेल आणि दीर सिदीप मशाक पटेल या तिघांना अटक केली आहे. तसेच नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A woman has died by suicide driven to it by harassment from her in laws nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार
1

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून
2

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
3

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार
4

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.