Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime : नातवानेच केली आजोबाची क्रूर हत्या; धारदार शस्त्रांनी डोक्यात वार केलं, नंतर हाताच्या नसा कापल्या आणि…

रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात ३१ जुलैला हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटे असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2025 | 02:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात ३१ जुलैला हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटे असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी तपास केला असून आरोपीची ओळख पटली असून मारेकरी दुसरा तिसरा कोणी नाही तर मृत वृद्ध व्यक्तीचाच नातू निघाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Solapur crime: सोलापूर हादरलं! सावत्र आईने ३ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून केला खून, जेवण करत नाही आणि….

नेमकं काय घडलं?

आरोपीचं नाव मोहमद असगर अली परदेशी (१८ वर्षीय) असं आहे. तर मृतकाचे नाव आजोबा शौकत अली हुसेनमियाँ परदेशी (वय 72 वर्ष) असे आहे. आधी नातवाने आपल्या आजोबाची हत्या केली त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्लॅन आखला. त्याने पोलिसांना सांगितले की आजोबांची हत्या झाली. एक जण त्यांना मारुन घरातून पळून गेल्याचा बनाव त्याने उभा केला. त्याने आपल्या डोक्यावर मारेकऱ्याने कापड टाकल्याचंही सांगितलं, पण पोलिसांनी शेजाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार आणि त्याच्या हातावर झालेल्या जखमांची चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने कबुली दिली.

कशी केली हत्या?

आजोबा गाढ झोपेत होते. तेव्हा तो लोखंडी रॉड आणि घरातील धारदार सूरी घेऊन आजोबांच्या खोलीत गेला. नातवाने आजोबाच्या डोक्यावर लोलखंडी रोडने जोरदार वार केला. त्यानंतर सुरीने गळ्यावर वार केले, तसेच दोन्ही हातांचे मनगटाच्या नसा कापून त्यांना संपवलं.

का केली हत्या?

‘तुम कितना भी पढ लो, तेरा कुछ नही हो सकता’, ‘तुम ऐसेंही रहोगे’, असे टोमणे आजोबा सतत नातवाला मारत होते. त्यामुळे रागाच्या भरात आजोबांचा खून केल्याची माहिती आहे.

आरोपीला अटक

म्हसळा पोलिसांनी केवळ तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी नातू मोहमद असगर अली परदेशी याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

भोसरी एमआयडीसीतील दुकान फोडलं; 40 लाखांचे साहित्य चोरीला, पोलिसांना माहिती मिळताच…

 

Web Title: Grandson brutally murdered grandfather stabbed him in the head with sharp weapons then cut his hand veins and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Haryana Crime: प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन
1

Haryana Crime: प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना
2

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण
3

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी
4

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.