crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सोलापूर: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातून एक अतिशय धक्कदायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेही आपला जीव सोडला आहे. आजीचं नाव जनाबाई व्हानमाने असे आहे. तर नातवाचा नाव आदित्य व्हॅनमने असे आहे. या मुलाचा मृत्यू कारणे जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती झाला. या दुर्दैवी घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ आदित्य व्हनमाने या मुलाचा कारने जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता. आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. आदित्यने शाळा सुटल्यानंतर खाजगी दुचाकीस्वाराला हात करत गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली. मात्र त्याचवेळी दुचाकीवर निघालेल्या आदित्यला एका कारचालकने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि गाडीवरील चालक जखमी झाला, तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला.
दरम्यान, आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का बसला. परिणामी आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी आजी आणि तत्वावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही आहे. काल बुधवारी बार्शी येथील कला केंद्रातील एका नर्तिकामुळे एका उपसरपंचां आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता माढ्यातील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
का झाला वाद?
सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही आहे. काल बुधवारी बार्शी येथील कला केंद्रातील एका नर्तिकामुळे एका उपसरपंचां आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता माढ्यातील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.