बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या मागचं कारण असं की जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकारण. बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा मनाई आदेश २५ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. समाज माध्यमातून होणाऱ्या पोस्टचे पडसाद रस्त्यावर होऊ लागले आहेत. तर बॅनरबाजीमुळेही अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, नवरात्र उत्सवाची सुरुवात या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी आजपासून(13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतील. अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी दिली आहे.
Thane Crime: गणपती दर्शनासाठी गुजरातला गेलेला तरुण ठरला अपहरणाचा बळी; पाच दिवसांचा थरार संपला
शासन निर्णया संबंधित आदेश
या मनाई आदेशादरम्यान, काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास शस्त्र, सोटे, काठी, बंदूक आदी वापरण्यास परवानगी नाही.
अंबाजोगाईत पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
दरम्यान, बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे.यात पतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. पत्नीने पतीला लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली आहे. यामध्येच घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव कैलास सरवदे असे आहे तर माया असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
कैलास सरवदे यांचे सात वर्षांपूर्वी माया नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न होते. कैलास हा नेहमी दारू प्यायचा त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. याच वादातून मायाने कैलासाला मारहाण केली. यामध्ये तो बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोधित केले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीमुळं झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.