
crime (फोटो सौजन्य: social media)
Ghaziabad Crime News: बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये 7 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; हत्येपूर्वी…
काय घडलं नेमकं?
गीर हे भारतातील सिंहाचं एकमेव निवासस्थान आहे. भावनगर, अमरेली, जुनागढ आणि गीर या भागात प्रामुख्याने सिंहांचा वावर असतो. स्थानिक आणि सिंह एकत्रितपणे या परिसरात राहत असल्याचं पाहिलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून सिंहांकडून नागरिकांवर हल्ला केला जात असल्याचा समोर येत आहे. आता जुनागढ जिल्ह्यात येणाऱ्या पवित्र गिरनार पर्वतावर शनिवारी सकाळी मोठी घटना घडली आहे.
११ वर्षीय मुलावर सिंहाचा हल्ला
येथे एक कुटुंब अंबाजी माताच्या दर्शनासाठी पर्वतावरील शिड्या चढत होत्या. त्यावेळी ११ वर्षीय मयूर चव्हाण हा शिड्यांवर बसला होता. त्यादरम्यान अचानक एक सिंह गर्दीतून त्याला उचलून घनदाट जंगलात घेऊन गेला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण गिरनार भागात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर भाविकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
ही घटना शनिवारी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी घडली. रिमझिम पाऊस सुरू होता. यादरम्यान भाविक माताचा जयजयकार करीत गिरनारच्या पायऱ्या चढत होते. ५० व्या शिड्याजवळ शेकडो भाविकांदरम्यान अचानक सिंहाने मुलावर हल्ला केला.
सिंह नरभक्षक का होत आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून या भागात तीन सिंह वावरताना दिसत आहेत. घटनास्थळाहून तब्बल १०० मीटर दूर पायऱ्यांजवळ मुलाच्या पायाचे अवशेष सापडले. वन विभागाने सिंहाच्या पायाचे निशाण, ओढल्याच्या खुणा आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत माणूस आणि सिंह एकत्र आनंदाने नांदत होते. मात्र अचानक सौराष्ट्रमधील सिंह नरभक्षक का होत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
Ans: गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर.
Ans: अंबाजी माताच्या दर्शनासाठी आलेल्या 11 वर्षीय मयूर चव्हाण या मुलाचा मृत्यू झाला.
Ans: घटनास्थळाची पाहणी करून सिंहाच्या पावलांचे ठसे, इतर पुरावे गोळा करत तपास सुरू केला आहे.