Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: घरात डोकावल्याचा संशय… चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली; उपचारादरम्यान मृत्यू, 24 तासांत आरोपी जेरबंद

साताऱ्यातील पाचगणी परिसरात घरात डोकावल्याच्या संशयातून २४ वर्षीय अक्षय जाधव याला चौघांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचगणी पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 03:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात डोकावल्याच्या संशयातून चौघांनी अक्षय जाधव याच्यावर लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.
  • गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • पाचगणी पोलिसांनी २४ तासांत चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
सातारा: सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात डोकावून पाहिल्याच्या संशयातून एका २४ वर्षीय तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या खुनाच्या प्रकरणाचा पाचगणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत चारही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय घडलं नेमकं?

अक्षय रमेश जाधव (भिगवण, त. इंदापूर) हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आला होता. रात्रीच्या वेळी मित्रांसोबत मद्यपान झाल्यानंतर अक्षयची प्रकृती बिघडू लागल्याने मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली आणि ते वरच्या मजल्यावर गेले. काही वेळाने अक्षय खोलीबाहेर कसा आला, याबाबत नेमकी माहिती नसली तरी तो जवळच असलेल्या एका घराजवळ गेला. त्या घरात डोकावून पाहिल्याचा राग घरातील व्यक्तींनी मनात धरला. सूर्यकांत चंद्रकांत गोळे, अविनाश सतीश भोसले, राहुल जनार्दन राजपुरे आणि अमोल गेणदेव वाडकर या चौघांनी अक्षयला अडवले, नंतर त्याला हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली.

Pimpri-Chinchwad News: आकुर्डीत रिक्षात गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप गूढ

या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला तातडीने पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील डॉ. बोके रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.

चारही आरोपी अटकेत

या घटनेनंतर मृताचा मित्र विशाल अजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) आणि 2(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत चारही आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे सात तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने चारही आरोपींना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Jalna Crime News: भररस्त्यात बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न; विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरातील भोसे गावात ही घटना घडली.

  • Que: तरुणावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: घरात डोकावून पाहिल्याचा संशय आल्याने चौघांनी त्याच्यावर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पाचगणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Satara crime suspected of peeking into a house a young man was brutally beaten by four individuals he died during treatment and the accused were apprehended within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
1

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
2

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
3

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
4

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.