Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime News: भररस्त्यात बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न; विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

जालना जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात एका तरुणाने भररस्त्यात खासगी बस अडवून प्रवासी तरुणीला जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्या बस चालकाला त्याने मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बदनापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 03:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जालन्यात खासगी बस अडवून तरुणीला जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  • विरोध करणाऱ्या बस चालकाला आरोपीने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली; घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
  • बदनापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
जालना: जालना जिल्ह्यात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक परिसरातून जात असलेल्या एका खासगी बसमध्ये घुसून एका तरुणाने प्रवासी तरुणीला जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला बस चालकाने विरोध करताच आरोपीने त्यालाही बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून बदनापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

काय नेमकं घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील औद्योगिक परिसरातून एक खासगी ट्रॅव्हल्सची बस प्रवाशांना घेऊन जात होती. याचवेळी एका तरुणाने अचानक बस अडवून थेट आत प्रवेश केला. बसमध्ये बसलेल्या एका तरुणीला त्याने जबरदस्तीने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बस चालकाने आरोपीला याबाबत जाब विचारत तरुणीला सोडण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच चालकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

गुन्हा दाखल

या संपूर्ण घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे बदनापूर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भररस्त्यात एका तरुणीची छेड काढत चालकाला मारहाण करणाऱ्या या गुंडाला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या

जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नी आणि चार मुलींनी मिळून आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे घडली. या प्रकरणी मृतकाच्या सावत्र भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नीसह चार मुलींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri-Chinchwad News: आकुर्डीत रिक्षात गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप गूढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालना शहरातील औद्योगिक परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने नेमकं काय केलं?

    Ans: आरोपीने खासगी बस अडवून बसमध्ये घुसत एका तरुणीला जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि विरोध करणाऱ्या चालकाला मारहाण केली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: बदनापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalna crime news bus intercepted in the middle of the road attempt made to drag a young woman out driver brutally beaten for resistingincident captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
1

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…
3

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.