
crime (फोटो सौजन्य: social media)
Dnyaneshwar Katke accident: आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या भरधाव कारने बालिकेला उडवले; प्रकृती गंभीर
नेमकं प्रकरण काय?
ही घटना गुजरातमधील वडोदरा येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव इरशाद अब्दुल करीम बंजारा असे आहे. १८ नोव्हेंबर रोजी इरशाद यांचा संशयास्पद पद्धतीने झाला. सुरुवातीला कुटुंबियांना तो एक अपघाती मृत्यू वाटला त्यामुळे त्यांना कोणताही संशय न घेता, दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांकडून त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु इरशादच्या मृत्यूनंतर, कुटुंबियांना इर्षादच्या पत्नीच्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं. इरशादची पत्नी तितकी दुःखी दिसत नव्हती.तिच्या या वागण्यामुळे कुटुंबियांचा इरशादच्या पत्नीवर संशय आला.
पुरलेला मृतदेह काढला बाहेर
त्याचवेळी इरशादच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. तेव्हा त्यांचा संशय आणखीन वाढत गेला. इरशादची हत्या त्याच्या पत्नीने तिचा प्रियकर आणि मित्रांसोबत कट रचून केल्याची शंका त्यांना आली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. इरशादचा पुरलेला मृतदेह दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला आणि त्यांनतर मृत्यूमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी त्याला पोस्टमार्टमसाठी गोत्री रुग्णालयात पाठवण्यात आला.
पोस्टमॉर्टम नंतर सत्य समोर
तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सत्य समोर आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नाही तर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही एक सुनियोजित हत्या होती. हे समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहे.
Ans: पत्नीचे दुःखी न वाटणारे आणि विचित्र वर्तन पाहून कुटुंबियांनी संशय व्यक्त केला.
Ans: इरशादचा मृत्यू अपघाती नसून गळा दाबून केलेली हत्या असल्याचे उघड झाले.
Ans: मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.