
निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान आणि किशोरी यांच्यात दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबियांना त्यांच्या नात्याची माहिती होती. पण अलिकडेच किशोरीने ईशानपासून दूर राहण्यास सुरुवात केली. कुटुंबियांना तिचे लग्न नात्यातच दुसरीकडे लावून देण्याचा विचार करत होते. यावरुन नाराज झालेल्या ईशानने अरबाजसोबत मिळून किशोरीच्या हत्येचा कट रचला.
किशोरीने लग्नास नकार दिला…
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री किशोरी दुकानातून घरी परतत असताना आरोपींना वाटेतच तिला अडवलं आणि जबरदस्ती गाडीत बसवलं. आरोपी तिला बलेनो कारमध्ये जबरदस्तीने बसवून डोंगरावर घेऊन गेले. इथे पोहचल्यानंतर ईशान किशोरीला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होता ज्याला किशोरीने स्पष्ट नकार दिला. यावरुनच दोघांमध्ये वाद सुरु झाला. ईशानच्या इशाऱ्यानंतर अरबाजने किशोरीचे हात पकडले आणि मग प्रेमी ईशानने ओढीणीने किशोरीचा गळा आवळला. हत्येनंतर दोघेही किशोरीचा मृतदेह झाडांमध्ये टाकून फरार झाले. सोमवारी जेव्हा किशोरीचा मृतदेह सापडला तेव्हा कंपू पोलिस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फाॅरेंसिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरुन सर्व पुरावे गोळा करण्यात आले आणि किशोरीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
पोलिसांनी सांगितले की, किशोरी एका साडी सेंटरमध्ये काम करत होती. रविवारी जेव्हा ती दुकानातून घरी परतली नाही तेव्हा कुटुंबियांनी तिची हरवल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबियांचा थेट संशय ईशानवर होता. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यात ईशान किशोरी काम करत असलेल्या दुकानाबाहेर पाहणी करत असताना पकडला गेला. पोलिसांनी या फुटेजच्या मदतीने कारचा नंबर नोट केला आणि कारमालकाचा पत्ता त्यांच्या हाती लागला. चाैकशीत स्पष्ट झाले की, ईशानने दुसऱ्याची कार काहीवेळासाठी मागून घेतली होती.
जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
आरोपींची चाैकशी सुरु
या प्रकरणात पोलिसांनी ईशान आणि त्याचा साथीदार अरबाज या दोघांनाही अटक केली आहे. चाैकशीत ईशानने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, लग्नाला तयार न झाल्याने त्याने किशोरीची हत्या केली. दोन्ही आरोपींना सध्या कोठडीत कैद करण्यात आलं असून हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि जबाबाच्या जोरावर आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जाईल.