Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

Kokankada Death: "कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय..." आई-वडिलांना केलेला शेवटचा फोन कॉल अन् हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यात सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह! लोहगडनंतर आता हरिश्चंद्रगडावर खळबळ... नेमकं काय घडलं?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 02:30 PM
Kokankada Death: "कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय..." शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

Kokankada Death: "कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय..." शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

Follow Us
Follow Us:
  • हरिश्चंद्रगडाच्या  कोकणकड्याच्या खोल दरीत २० वर्षीय तरुणाचा सापडला मृतदेह
  • बेपत्ता होण्यापूर्वी त्याने ‘कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याचे’ आई-वडिलांना सांगितले
  • ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला; पूर्वीही येथे दोन सांगाडे सापडल्याची माहीती
Kokankada Death: लोहगडावरील सिया गोयल प्रकरणानंतर ट्रेकर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, आता महाराष्ट्राचा ‘हिमालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावरून एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. हरिश्चंद्रगडाच्या प्रसिद्ध कोकणकड्याच्या खोल दरीत राजस्थानमधील एका २० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. खुशाल चेनाराम प्रजापती असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याने मृत्यूपूर्वी केलेल्या एका फोन कॉलमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. 

हेही वाचा: FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

कोण करत होते ब्लॅकमेल? गूढ कायम!

मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल प्रजापती हा मुंबई-इगतपुरीमार्गे प्रवास करत शनिवारी दुपारी एका खासगी वाहनाने राजूर येथे आला होता. तेथे पोहोचल्यानंतर त्याने एका हॉटेलचालकाच्या फोनवरून आपल्या आई आणि वडिलांशी संपर्क साधला होता. या संभाषणादरम्यान “कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करत आहे,” असे धक्कादायक विधान त्याने केले होते. यानंतर खुशालचा कोणताही फोन न आल्याने आणि त्याचा पत्ता न लागल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

दरीतून मृतदेह काढला बाहेर; कुटुंबीयांचा आक्रोश

दरम्यान, गडावर गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना कोकणकड्याच्या खोल दरीत एक मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती राजूर पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबीयांना पाचारण केल्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली, यावेळी घटनास्थळी कुटुंबीयांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. कोकणकड्याची खोली आणि कठीण भौगोलिक परिस्थिती पाहता लोणावळ्यातील अनुभवी ट्रेकर्सच्या बचाव पथकाची मदत घेण्यात आली आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र, खुशालला नेमकं कोण ब्लॅकमेल करत होतं, याचा तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

हेही वाचा: Student Suicide: लग्नासाठी तगादा अन् ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या…

हरिश्चंद्रगड ठरतोय मृत्यूचा सापळा?

हिवाळ्यात हरिश्चंद्रगडावर जाणे हा सुंदर अनुभव असला, तरी अपुरी माहिती आणि अतिउत्साह पर्यटकांच्या जिवावर बेतत आहे. कोकणकड्याला सुरक्षेसाठी ग्रील लावलेले असतानाही अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून कड्याच्या टोकावर बसण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीही सहा महिन्यांपूर्वी एका बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत असताना कोकणकड्याच्या ८०० फूट खोल दरीत सिल्वासा येथील रोहित सोळुंके आणि लातूर येथील गणेश होनराव या दोन तरुणांचे सांगाडे सापडले होते. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड आता मृत्यूचे केंद्रबिंदू ठरतोय का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यात आढळलेल्या मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: राजस्थानमधील २० वर्षीय खुशाल चेनाराम प्रजापती असे या मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: खुशाल प्रजापती याने मृत्यूपूर्वी आई-वडिलांना फोनवर काय सांगितले होते?

    Ans: राजूर येथे आल्यानंतर त्याने एका हॉटेलचालकाच्या फोनवरून आई-वडिलांना कॉल करून 'कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे' सांगितले होते.

  • Que: कोकणकड्याच्या दरीतून मृतदेह कोणी बाहेर काढला?

    Ans: वन कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर राजूर पोलिसांना कळवले आणि त्यानंतर लोणावळ्यातील अनुभवी ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला.

Web Title: Harishchandragad kokankada 20 year old youth death blackmail mystery sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Accident Death
  • Lonawala
  • Trekking

संबंधित बातम्या

Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!
1

Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..
2

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!
3

Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.