अस्तित्वात नसलेले देश, दूतावास अन् आलिशान गाड्या; हर्षवर्धनने थाटलेल्या करोडोंच्या साम्राज्याची इसाईड स्टोरी, एकदा वाचाच
वेस्ट आर्क्टिका, सबोरगा, पॉलविया, लोडोनिया… अशा देशांची नावं तुम्ही कधी ऐकलाय का? पण उत्तर प्रेदशमधील गाझीयाबादमध्ये या देशांचा शोध लागला आहे आणि या देशांचे दूतावासही आहेत. आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे.आलिशान हवेली , त्याच्या बाहेर अनेक देशांचे झेंडे आणि बाहेर पार्क केलेल्या तितक्याच आलिशान गाड्या. दूतावासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम यांच्यासोबतचे फोटो. गोंधळात पडलात तर थांबा आणि या देशांची आणि यांचे दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनच्या साम्राज्याची इनसाईड स्टोरी वाचा…
डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केले घाणेरडे कृत्य! बिल्डिंगच्या लोकांनी केली मारहाण; नेमकं काय प्रकार?
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या (ATS) नोएडा युनिटने मंगळवारी गाझियाबादमधून एका संशयास्पद व्यक्तीला अटक केली होती. हर्षवर्धन जैन असं या व्यक्तीचं नाव आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार त्याची चौकशी करण्यात येत होती आणि तो एकमागून एक खुलासे करत होता. त्याचे खुलासे ऐकून अधिकाऱ्यांना भोवळ येत होती. पोलिस आणि गुप्तचर संस्थांही चक्रावून गेल्या आहेत. तर हर्षवर्धन जैन गाझियाबादच्या कविनगर भागात बनावट ‘दूतावास’ चालवत होता आणि स्वतः या देशांचा राजदूत असल्याचं सांगत होता. हे नेटवर्क केवळ ओळख लपवून चावलं जात होतंच शिवाय परकीय चलनाचे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. यासाठी कवीनगरमध्ये स्वत: वेगळं साम्राज्य त्याने निर्माण केलं होतं.
हर्षवर्धन जैन स्वतःला ‘मायक्रोनेशन’ किंवा राजदूत असल्याचं भासवत होता. त्याने वेस्ट आर्क्टिका, साबोर्गा, पॉलविया, लोडोनियाच्या नावाने दूतावास उघडले होते. विशेष म्हणजे इंटरनेटवर कुठेही या देशांचा उल्लेख नाही. जर तुम्ही गुगलवर साबोर्गा शोधलात तर तुम्हाला आढळेल की असा कोणताही देश नाही, तर एक गाव आणि सूक्ष्म राष्ट्र आहे ज्याला देशाचा दर्जा मिळालेला नाही. दुसरे नाव पालविया होते, जे शोधल्यावर तुम्हाला काही लोकांच्या नावाचे शीर्षक मिळते. त्याचप्रमाणे, जेव्हा लाडानिया शोधले जाते तेव्हा ते एका प्रयोगशाळेचे नाव असल्याचं दिसतं. ही व्यक्ती एका देशाचं नाव वेस्ट आर्क्टिका असं लिहित असे , गुगलवर शोधल्यावर संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या एका गैर-नफा संस्थेचं नाव असल्याचं समोर आलं
हर्षवर्धनने गाझियाबादच्या केबी ३५ कविनगर येथे असलेल्या भाड्याच्या घरात दूतावासासारखे संपूर्ण सेटअप उभारले होते. येथे परदेशी ध्वज, बनावट राजनैतिक पासपोर्ट आणि बनावट कागदपत्र मिळत होते. हर्षवर्धन स्वतःला आंतरराष्ट्रीय राजनैतिक असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करत होता.
२२ जुलै रोजी नोएडा एसटीएफने या बनावट दूतावासावर छापा टाकला आणि हर्षवर्धन जैन यांना अटक केली. चौकशीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि इतर परदेशी नेत्यांसोबतचे त्याचे मॉर्फ केलेले फोटो वापरून त्याचा प्रभाव वाढवल्याचं समोर आलं. या संपूर्ण कारवायामागील त्याचा मुख्य उद्देश परदेशात बनावट नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन, शेल कंपन्यांद्वारे बनावट पासपोर्ट आणि परकीय चलनाचा बेकायदेशीर व्यापार करण होता. खासगी कंपन्यांना परदेशी कनेक्शन देण्याच्या नावाखाली दलाली करून लोकांकडून पैसे उकळणे सुरू होतं.
हर्षवर्धन जैन हे नवीन नाव नाही. २०११ मध्येही त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर सॅटेलाइट फोन बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. कवीनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, तो वादग्रस्त आध्यात्मिक गुरू चंद्रास्वामी आणि आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र विक्रेता अदनान खगोशी यांच्या संपर्कात होता. त्यामुळे हर्षवधनचं नेटवर्क केवळ स्थानिक किंवा राज्य पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संशयास्पद कारवायांशी देखील जोडले गेलं आहे.
एसटीएफने केलेल्या शोधात जप्त केलेल्या वस्तूंमध्ये डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या चार लक्झरी कार होत्या. बनावट मायक्रोनेशनच्या नावाखाली बनवलेले १२ डिप्लोमॅटिक पासपोर्ट. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे शिक्का असलेले बनावट कागदपत्रे, दोन बनावट पॅन कार्ड, ३४ वेगवेगळ्या कंपन्या आणि देशांचे बनावट शिक्के, दोन बनावट प्रेस कार्ड, ४४,७०,००० रुपये रोख आणि अनेक देशांचे परकीय चलन, तसेच १८ वेगवेगळ्या राजनैतिक नंबर प्लेट सापडल्या आहेत. आरोपीने स्वतःला आंतरराष्ट्रीय राजनैतिक व्यक्ती असल्याचे सिद्ध करण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर केला.
धक्कादायक ! बागेतच अल्पवयीन मुलावर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार; चॉकलेटचं आमिष दाखवलं अन्…
सध्या आरोपीविरुद्ध गाझियाबादच्या कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आर्थिक व्यवहार कोणासोबत झाले, याद्वारे परदेशात संपर्क साधण्यासाठी किती कंपन्यांना आमिष दाखवण्यात आले आणि ही व्यक्ती कोणत्या हवाला नेटवर्कशी जोडली गेली होती याचाही एसटीएफ तपास करत आहे. या प्रकरणाची मुळे देशाबाहेरही असू शकतात असाही तपास यंत्रणांचा संशय आहे.