crime (फोटो सौजन्य: social media )
हरयाणा: हरयाणातील यमुनानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनेने आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर तीच सर्वात जास्त आक्रोश करत होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांना तपास केला असता भयंकर कट समोर आले. या घटनेने सर्वानाच धक्का बसला.
नेमकं क्या आहे प्रकरण?
ओमप्रकाश नावाच्या एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच वाड्यामध्ये आढळला होता. ओमप्रकाश यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात समोर आले की, ओमप्रकाशची सून ललिताचे करतार नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. ओमप्रकाश यांना हे अवैध संबंध कळले होते आणि ते त्याचा पर्दाफाश करण्याची शक्यता होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने ललिताने प्रियकर करतारसोबत मिळून ओमप्रकाश यांना संपवण्याचा कट रचला. तिने आधी सासरच्यांना वाड्यामध्ये झोपायला पाठवले आणि तिथेच त्यांची हत्या केली. ही घटना यमुनानगरमधील रादौर येथे पाच दिवसांपूर्वी घडली.
पोलिसांना का आलं संशय
ओमप्रकाशच्या हत्येनंतर त्यांची सून ललिता सर्वात जास्त आक्रोश करत होती आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत होती. ‘जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही,’ असेही तिने म्हटले होते. कारण, त्यांच्या कुटुंबात 25 दिवसांमध्ये झालेली ही दुसरी हत्या होती. मृत ओमप्रकाश यांच्या नातवाचा 20 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पश्चिम यमुना कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणातही ललितावर संशय व्यक्त केला आहे आणि त्या हत्येबद्दलही तिची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी आरोपी सून ललिता आणि तिचा प्रियकर करतार या दोघांनाही अटक केली आहे. ललिताने पोलीस तपासावर आणि पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते. आता तिचीच बोलती पोलिसांनी बंद केली. पोलीस पुढील चौकशीसाठी ललिताला रिमांडवर घेणार आहेत.
दरम्यान, अनैतिक संबंधाचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. अनेक ठिकाणी पती किंवा पत्नीने परस्पर संशय, मतभेद किंवा अवैध संबंधातून एकमेकांची हत्या केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अनैतिक संबंधांमुळे वाढणारी गुन्हेगारी ही आता चिंतेचा विषय बनली आहे आणि त्यावर समाजाला तसेच यंत्रणांना गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.