हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आणि विवाहित असूनही ही गोष्ट लपवून दिल्ली पोलिसात नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. ही घटना हरियाणाच्या पलवलमध्ये घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हरियाणाच्या पलवलमधील बडोली गावात 26 वर्षांचा पीतम रहिवासी आहे. पीतमने २०२१ मध्ये एक लायब्ररी सुरू केली होती. ज्यात तरुण सरकारी नौकरीची तयारी करत होते. याच लायब्ररीमध्ये त्याची ओळख राजीव नगरमधील एका मुलीशी झाली. हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री झाली नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पीतमने आपल्या कुटुंबालाही या नात्याबद्दल सांगितले.
४ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी बल्लभगड येथील आर्य समाज मंदिरारात लग्न केले. लग्नानंतर ते एका फ्लॅटमध्ये राहू लागले. त्याचवेळी, त्यांच्या पत्नीने दिल्ली पोलिसातील भरतीसाठी अर्ज केला. पीतमने सांगितले की, आपल्या पत्नीच्या शिक्षणाचा आणि तयारीचा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. ही गरज पूर्ण करण्यासाठी त्याने आपली लायब्ररी आणि काही जमीन विकली. त्याने आपल्या पत्नीला लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट या दोन्हीमध्ये मदत केली. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याच्या पत्नीला दिल्ली पोलिसातील प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.
प्रशिक्षणानंतर पत्नीने त्याच्यासवबत राहण्यास नकार दिला
पीतमचा आरोप आहे की त्याच्या पत्नीने पडताळणीदरम्यान स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले, तर ते विवाहित होते. त्याला ही गोष्ट नंतर कळली. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर त्याची पत्नी थेट माहेरी निघून गेली आणि तिने पीतमशी कोणताही संपर्क ठेवला नाही. पीतम त्याच्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला, तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी सामाजिकरित्या लग्न न झाल्याचे कारण देत मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास नकार दिला. त्याच्या पत्नीनेही त्याच्यासोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिला.
पतीने दाखल केली तक्रार
पीतमने या फसवणुकीबाबत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली येथे तक्रार दाखल केली आहे. पत्नी घटस्फोटासाठी दबाव टाकत असल्याचा दावा त्यानं केला. त्यानं दिल्ली पोलीस आयुक्तांकडंही तक्रार केलीय. त्यामध्ये पत्नीनं लग्नाची माहिती लपवली असल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर पीतमनं पत्नीला परत आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे आणि सेक्शन 9 अंतर्गत याचिका दाखल केली आहे, ज्याची सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होईल.
पत्नी माहेरी जाताना दाम्पत्यामध्ये वाद; नंतर मृतदेहच आढळल्याने नातेवाईकांना धक्का