Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या रात्री नक्की काय घडलं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, वधूसह 4 जणांवर FIR दाखल

Groom Suicide Case : लग्न सुरळीत पार पडलं, दुसऱ्या दिवशी वधूला सासरी आणण्यात आलं आणि त्याच रात्री वराने रेल्वेसमोर येऊन आपलं आयुष्य संपवलं. घटनाक्रम लहान असल्याने या मृत्यूवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 02:57 PM
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, लग्नाच्या दुसऱ्याचा दिवशी नवरदेवाची रेल्वेसमोर येऊन आत्महत्या

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, लग्नाच्या दुसऱ्याचा दिवशी नवरदेवाची रेल्वेसमोर येऊन आत्महत्या

Follow Us
Close
Follow Us:
  • हरियाणातील एका नवविवाहित जोडप्याशी संबंधित धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
  • लग्नानंतर घरात झालेल्या वादामुळे आणि काही फोन कॉल्समुळे तरुण मानसिक तणावात असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
  • पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हा दाखल करत प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने सर्वांनाच चकित केलं. लग्न पार पडलं पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने स्वत:ला संपवून टाकलं. या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका रात्रीतच वराने इतके टोकाचे पाऊल का उचलले आणि यामागे कुणाचा हात आहे याचा तपास केला जात आहे. सांगण्यात येत आहे की, नवऱ्याने होडन रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर आता अनेकांवर या मृत्यूचे आरोप लावण्यात आले असून मृताच्या भावाने लग्नाच्या रात्री नवरदेवाचे त्याच्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाल्याचे स्पष्ट केले आहे.

Parbhani Crime: परभणीत थरार! कोयत्याने सपासप वार; तरुणाचा पंजा मनगटापासून वेगळा

सांगण्यात येत आहे की, या भांडणानंतर वधूच्या ओळखीच्या काही लोकांनी फोन करुन नवरदेवाला त्रास दिला आणि त्याला बदनाम करण्याची धमकी देखील दिली. यामुळेच नवरदेवाने तणावात येऊन स्वत:ला संपवले. सदर घटनेतील मृताचे नाव ओमप्रकाश असल्याचे समोर आले आहे. तो वली मोहम्मद पुर उर्फ लहरपुर इथला रहिवासी होता. घटनेच्या १६ दिवसांनंतर फरिदाबादच्या शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मृताची पत्नी आणि चार अन्य युवकांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

मृताचा भाऊ जयप्रकाश याने दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाशचा विवाह २९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील शेरगढ येथील रहिवासी भूमिका हिच्याशी झाला होता. हिंदू परंपरेनुसार त्यांचे लग्न पार पडले आणि ३० एप्रिल रोजी वधूसह सर्वजण आपल्या घरी परतले. कुटुंबाचा आरोप आहे की, ३० एप्रिलच्या रात्री भूमिका आणि ओमप्रकाश यांच्यात काही गोष्टींवरुन गंभीर वाद झाला. हा वाद इतका पेटला की त्यांचा आवाज खोलीबाहेर येऊ लागला.

तक्रारीनुसार, लग्नाच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मृत ओमप्रकाशच्या फोनवर चार नंबरवरुन सतत काॅल्स येत होते. या चार युवकांच्या नावात जय निषाद, संजीव, नारायण सिंह आणि वेदराम यांचा समावेश असल्याची माहिती आहे. हे सर्व वधूच्या जवळचे आणि ओळखीतले असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात नंबर्सवरुन फोन काॅल्स येत असल्याने ओमप्रकाश घाबरला होता आणि मानसिकदृष्ट्या तो अस्वस्थ झाला होता. वडिल अशोक यांनी सांगितलं की, भितीने ओमप्रकाशने ही सर्व बाब त्यांना येऊन सांगितली होती. त्यांनी ओमप्रकाशला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण सतत येणाऱ्या त्या फोन काॅल्सने त्याला तणवात टाकलं होतं.

Pune Murder : पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर…

दुसरीकडे जेव्हा वधूची चाैकशी करण्यात आली तेव्हा तिने या सर्व आरोपांना फेटाळून लावलं. तिने म्हटलं की, ओमप्रकाशला फोनवर कुणाचाही काॅल आला नव्हता. तक्रार आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे, जीआरपी पोलिसांनी आता आरोपींविरोधात नावासह एफआयआर दाखल केली असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

 

Web Title: Haryana palwal newlywed groom committed suicide by stepping in front of a train crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • marriage
  • Suicide case

संबंधित बातम्या

Pune Murder : पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर…
1

Pune Murder : पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर…

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?
2

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल
3

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
4

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.